साहित्य : अर्धा किलो पनीर, एक वाटी साखर, केशर किंवा केशरी रंग, बेदाणे, वेलदोडे, पिस्ते, बदाम.
कृती : कढईत पनीर व साखर मिसळून कोरडे होईपर्यंत परतावेत. नंतर वेलदोड्यांची पूड व केशर किंवा केशरी रंग घालून पनीर कोरडे होताच कढई खाली उतरवावी व पनीर गरम असतानाच त्याचे गोळे करून पाहिजे तो आकार द्यावा. वरून बेदाणे, बदाम आणि पिस्ते यांचे काप लावावेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा