Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमचा प्रवास बनवा स्मरणीय

तुमचा प्रवास बनवा स्मरणीय

वेबदुनिया

PR
चांगल्या जीवनासाठी फिरायला आणि पर्यटनाला जाणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या जीवनात नवीन उत्साह, आशा जागी होते आणि जीवनात प्रसन्नता येते, पण सध्याच्या व्यस्त आयुष्यत सहली, पर्यटन आणि फिरायला सहसा शक्य होत नाही, तर मग आपल्या जीवनात प्रसन्नता का निर्माण करू नये.

आजकालच्या तणावपूर्ण आणि व्यस्त आयुष्यात सहली आणि फिरायला जाणे संपत चालले आहे. जीवन फक्त घर आणि ऑफिसच्या जबाबदार्‍या व बस-ट्रेनमधील घाई गडबडीपर्यंत मर्यादित होत आहे. अशा परिस्थितीत सहल व पर्यटनाला जाणेही एक डोकेदुखी वाटते, पण खर्‍या पर्यटनाचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा पर्यटन पूर्ण तन्मयतेने आणि कोणत्याही तणावाशिवाय पार पडते. प्रवास म्हणजे फक्त बस, रेल्वे, टॅक्सी किंवा विमानाने जाणे नव्हे, तर आपल्या दिनचर्येला आयुष्यापासून वेगळे करणारी जवळची शतपावलीदेखील एक चांगला प्रवास म्हटला जाऊ शकतो. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

कधीही मानत नसताना फिरायला जाऊन नये. इच्छा असेल तेव्हाच आरि मन पूर्णत: तयार करून प्रवासाला निघावे.

कोणतेही काम अपूर्ण ठेवून प्रवासाला जाऊ नये. घर किंवा ऑफिसच्या जबाबदार्‍या पूर्ण करूनच बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मन ऑफिसमध्ये गुंतू नये.

पर्यटनासाठी रोमांचक स्थळ निवडावे जे तुमच्यासाठी पूर्णत: नवीन असेल.

webdunia
PR
प्रवासासाठी निघताना शक्यतो सायंकाळची वेळ निवडावी ज्यामुळे बस, रेल्वे किंवा जहाजात नवीन रात्र घालवण्याची संधी मिळेल.

शक्य असल्यास सोबत लग्नाचा अल्बम किंवा संस्मरणीय फोटो ठेवावेत. वेळ मिळाल्यास हे फोटो पाहावे. यामुळे फक्त गोड आठवणीच जाग्या होणार नाहीत, तर धकाधकीच्या आयुष्यात विस्मरणात गेलेले प्रेमही जागे होईल.

एकमेकांना त्रास होईल आणि रंगाचा बेरंग होईल असे काम किंवा नावाचा उल्लेख येऊ देऊ नये. संधी मिळेल तेव्हा एकमेकांचे कौतुक करावे आणि असे क्षण कॅमेर्‍यात कैद करावेत जेणेकरून नंतरही कधी ते पाहिल्यास दिलासा मिळू शकेल.

नेहमीच्या आयुष्यात आपण जी गोष्ट करणे टाळतो ती प्रवासाला किंवा पर्यटनाला गेल्यानंतर निश्चित करून पाहावी.

स्वत:ला नवीन लूक किंवा आत्मविश्वास देणारे नवीन कपडे प्रवासादरम्यान घालावेत. विचार करा - पार करण्यासाठी आयुष्याक अडचणीच नसतील, तर माणसाच्या समृद्ध अनुभवाची माजच निघून जाईल. खल दर्‍याच नसतील, तर उंच शिखरावर घालवलेले क्षण कधीही अद्भुत वाटणार नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi