Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्रिउंडचे रोमांचक ट्रॅकिंग

त्रिउंडचे रोमांचक ट्रॅकिंग
WD
जोरदार पावसामध्ये ट्रॅकिंग करण्याची मजा काही औरच आहे. हिमालयाच्या पर्वतरांगेतील 'त्रिउंड' या ट्रॅकचे थ्रिल खरोखरीच अनुभवण्यासारखे असते. जवळजवळ दहा हजार फूट उंचीवर हा ट्रॅक आहे. कधी पावसाची रिपरिप तर कधी जोरदार वा-यामधून बर्फाळ डोंगराळ भागातून घसरणीतून पायवाट काढीत चढण चढताना नकळत देवाचे नामस्मरण होऊ लागते. पण, हा प्रवास संस्मरणीय ठरतो.

खरेतर हा रस्ता लांबलचक केल्यास मार्गावरील धोके कमी होऊ शकतात. लाका आणि बर्फाळ इंद्रहार द-या पार केल्यास आपणास कमी धोकादायक मार्गावरून पुढे जाता येते. पण, पावसाळ्यात हा मार्गही घसरडा आणि धोकादायक बनतो.
मॅक्लोडगंज येथून ट्रॅकिंगला सुरुवात होते. ही तिब्बतच्या निर्वासित सरकारची राजधानी आहे आणि दलाई लामा यांचे पीठ असल्याने हे श्रद्धेचे केंद्र आहे. बौद्ध मठ आणि बौद्ध भिक्षूंच्या या नगरीतूनच त्रिउंडकडे मार्गक्रमण करता येते.


हा मार्ग आपल्याला मेघालयातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणा-या चेरापूंजीची आठवण करून देतो. त्रिउंड पोहोचता पोहोचता दिवस कधी मावळतो याचा पत्ता लागत नाही. पावसाळ्यात जोरदार पावसामुळे याठिकाणी कमालीची गारठा जाणवतो. जोरदास पावसामुळे रस्ता दिसून येत नाही. एक पाऊल चुकले तरी दरीत कोसळण्याची भीती असते त्यामुळे ट्रॅकर्स पुर्णतयारीनेच चढाईस सुरुवात करतात.

या मार्गावर आपल्याला बौद्ध मठांतील घंटानादाचा आवाज येतो. मॅक्लोडगंजमधील भगसू फॉल्स आणि भगसू मंदिर आकर्षणाचे केंद्र आहे. या धबधब्या वरून चढाईस सुरुवात होते. त्रिउंडमध्ये उतरण्यासाठी वन विभागाचे एक गेस्ट हाउस आहे. पण मार्गावरच कोणतीच सोय नाही. जोरदार पावसाला दाद देतील अशा तंबूची व्यवस्था करावी लागते. रात्रभर पाऊस झाल्यानंतर दिवसाचे दृश्य पाहण्यासारखे असते. घाटामध्ये लपेटलेली धुक्याची चादर आणि हिमशिखरे पाहताना नजर हटतच नाही. मैक्लोडगंज आणि मार्गावरील बौद्ध मठांमध्ये सातत्याने वाजणा-या घंटा आपल्याला या निर्जन वनामध्ये कोणीतरी साद घालत असल्याचा आभास निर्माण करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi