Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दक्षिणचा समुद्र किनारा : अलप्पुझा

दक्षिणचा समुद्र किनारा : अलप्पुझा
, शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (15:49 IST)
अलप्पुझाने केरळच्या सागरी इतिहासात नेहमीच महत्वाचे स्थान भूषविले आहे, आज, ते नौका शर्यत, बॅकवॉटर सुट्ट्या, समुद्र किनारे, सागरी उत्पादने आणि कॉयर उद्योग यांसाठी प्रसिद्ध आहे. अलप्पुझा समुद्र किनारा हे एक लोकप्रिय सहलीचे ठिकाण आहे. इथल्या समुद्रात गेलेला खांब 137 पेक्षा अधिक वर्ष जुना आहे. विजया बीच पार्कमधील मनोरंजनाच्या सुविधा समुद्रकिनार्यानच्या आकर्षणात भर घालतात. इथे जवळच एक जुने लाईटहाऊसही आहे जे पर्यटकांना आकर्षित करते.
 
अल्लप्पुझामध्ये असताना घ्यावयाचा अन्य आनंददायक अनुभव आहे हाऊस बोट क्रूझ. अल्लप्पुझाच्या बॅकवॉटरमध्ये तुम्हाला हाऊस बोट पहायला मिळतात त्या खरंतर जुन्या काळातल्या केट्टुवल्लमचे सुधारित रुप आहे. मूळ केट्टुवल्लम किंवा राईस बार्जेज कित्येक टन तांदूळ आणि मसाले वाहून नेत. केट्टुवलम किंवा ‘गाठींची होडी’ ला असे म्हणत कारण संपूर्ण होडी नारळाच्या दोरखंडांच्या साहाय्याने एकत्र बांधली जात असे.
 
हल्लीच्या हाऊस बोट एका चांगल्या हॉटेलच्या सर्व सुविधांनी युक्त असतात, ज्यात सुसज्ज शयनकक्ष, आधुनिक शौचालय, आरामदायक बैठकीची खोली, स्वयंपाकघर आणि गळाने मासे पकडण्यासाठी गॅलरीही उपलब्ध असते आणि हाऊस बोट मध्ये रहात असताना तुम्ही बॅकवॉटर जीवनाच्या दृश्यांचा कोणत्याही अडथळ्याविना आनंद लुटू शकता. 
 
येथे पोहोचण्यासाठी: 
जवळचे रेल्वे स्थानक: अलप्पुझा, समुद्रकिनार्या पासून अंदाजे 5 किमी
जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, अलप्पुझा शहरापासून अंदाजे 85 किमी. 
 
Courtesy : Depertment of Tourism, Govt. of Kerala, India.  

Share this Story:

Follow Webdunia marathi