Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संगमरवरी जबलपूर!

संगमरवरी जबलपूर!
WD
WD
नर्मदा नदीच्या काठावर वसलेले जबलपूर शहर हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून ते 330 कि. मी. अंतरावर आहे. त्याला रामायण व महाभारताचा वारसा लाभला आहे. जबलपूर शहर संगमरवराचे शहर म्हणून जगात ओळखले जाते. देश- विदेशातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात व पर्यटनाचा आनंद लुटतात.

जबलपूरसह परिसरातील पर्यटन स्थळे-
मदन महाल किल्ला-
मदन महाल किल्ल्याची निर्मिती गोंड येथील राजा मदन शहाने केली होती. डोंगरात हा किल्ला तयार करण्यात आला होता. या किल्ल्यावरून जबलपूर शहर पहाता येते.

संग्राम सागर व बजाना मठ-
इ. स. पूर्व 1480-1540 मध्ये राजा संग्राम शहाने या भव्य इमारतींची निर्मिती केली होती. येथील तिलवारा घाटावर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या होत्या. तसेच 1939 मध्ये कांग्रेसचे अधिवेशन येथेच आयोजित करण्यात आले होते.

येथील माला देवी मंदिर 12व्या शतकात बांधण्यात आले आहे. या मंदिरातील मालादेवी अर्थात लक्ष्मीची मूर्ती त्याकाळच्या भाविकांनी तयार केली होती. ती आजही जशीच्या तशी आहे.

जबलपुरपासून 95 कि. मी. अंतरावर दक्षिण दिशेला मांडला जिल्हा आहे. तेथे कान्हा नॅशनल पार्क आहे. ते देशभरात प्रसिद्ध आहे. देश- विदेशातील पक्षी तेथे येत असतात. येथे प्राचीन किल्ल्यांचे अवशेष आजही पाहावयास मिळतात.

साधारण 1 कि. मी. च्या या नॅशनल पार्कमध्ये विविध जातीचे वृक्ष आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात.

पेच नॅशनल पार्क-
पेच नॅशनल पार्क हे 293 कि. मी. परिसरात विकसित झाले आहे. वन्य प्राण्यांच्या दृष्टीने हे सुरक्षित स्थळ आहे. पर्यटकांसाठी जंगलात फिरण्यासाठी जीपची व्यवस्था उपलब्ध आहे.

जबलपूरपासून 15 कि. मी. अंतरावर रामनगर येथे नर्मदा नदीच्या काठी गोंद राजाचा फार प्राचीन किल्ला आहे.

जबलपूरपासून 84 कि. मी. अंतरावर रूपनाथ हे शिव शंकराचे पुरातन मंदिर आहे. अती विशाल दगडाच्या मध्यभागी शिवलिंग आहे. भाविक तसेच पयर्टक भोळ्या शंकराची आराधना करतात.

भीमबेटका
1958 मध्ये 'भीमबेटका' या गुहांचा शोध पुरातत्त्व शास्त्रज्ञ वी. ऐस. वकंकर यांनी लावला होता. या गुहा सुमारे 10 हजार वर्ष जुन्या आहेत दगडांच्या गुहांना 'रॉक शेस्टर'ही म्हटले जाते. गुहेत ठिकठिकाणी आदिमानव तसेच वन्यप्राण्यांचे अनेक चित्रे कोरलेले आहेत. येथील विशाल दगडांवर आदिमानव द्वारा निर्मित भित्तिचित्रांची मालिकांचा दुर्लभ नजारा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. येथे भोपाळ येथूनही जाता येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi