Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वोत्तम ठिकाण पेहेलगाम

सर्वोत्तम ठिकाण पेहेलगाम

वेबदुनिया

, शुक्रवार, 25 मे 2012 (16:40 IST)
WD
पेहेलगामला जाऊन तुम्ही जगातल्या अशा सर्वोत्तम ठिकाणी पोचता की‍ जिथे मन व शरीर अगदी तणावरहित करून घेता येते. इधले आल्हाददायक वातावरण, सुखद हवामान, प्रेमात पडावा असा निसर्ग या त्रयींची लयलूट. शिवाय राहण्या-खाण्याची चोख व्यवस्था असलेली रेसॉर्टस आणि जोडीला काश्मिरी आदब तुमचे मन खूश करून टाकते. लीडर नदी आपली साथ न सोडता अखंडपणे खळखळत वातावरत अजूनच रोमॅटिक करते व हळूच आपल्याला पुन्हा आपल्या तारुण्यात नेऊन सोडते.

हा भाग ट्रेकिंग झोन गणला जातो. इथल्या धनगर वस्तीमुळे गरम कपडे, शाली, स्वेटर्स खूप बघायला मिळतात. इथली रिसॉर्टस-हॉटेल्स उत्कृष्ट आहेतच! त्यातील टपेस्ट्री काश्मिरी विणकरांची कलाकुसर दाखवते. तर इमारतीतील फर्निचर वर आक्रोडच्या लाकडाचे कोरीव काम उठून दिसते. रिसॉर्टसवर पोहचल्या-पोहचल्या गरमा गरम केशरमिश्रित, बदाम-आक्रोडयुक्त दूध व चहा तुमचा प्रवासाचा शीण पळवून लावतो. जेवणात तर पदर्थांसोबत काश्मिरी केशर पुलाव मनसोक्त खाऊन उबदार पांघरुणात छानशी वामकुशी घेऊन मनही ताजेतवाने होऊन जाते व निसर्गाच्या सुंदर लडींचे आकंठ पान करायला तयार होते. सोबतीला लीडर नदी व उन्हात चमकणारी हिमशिखरे बघत बघत आपण पेहेलगाम बाजार पालथा घालतो व ते अवर्णनीय सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवायचा प्रयत्न करीत असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi