Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इटलीतील शापित बेट

इटलीतील शापित बेट
, बुधवार, 15 जुलै 2015 (13:01 IST)
निसर्गसौंदर्याने नटलेले जगामध्ये एकाहून एक सरस व आकर्षक बेटे आहे. दरवर्षी हजारो लोक या बेटांवर फिरण्यासाठी जातात. मात्र काही बेटे अशीही आहेत, जी शापित समजली जातात. इटलीच्या नेपल्समध्ये असेच एक बेट आहे. 'गिओला आयलंड' असे या बेटाचे नाव असून त्याच्याबाबत असे सांगितले जाते की, या बेटावर बनलेल्या एका वाड्यारुपी घरामध्ये राहण्यासाठी जो कुणी गेला आहे, तो तिथून परतून येऊ शकलेला नाही. दुंभगलेल्या डोंगरांच्या दोन तुकड्यांप्रमाणे दिसणार्‍या या बेटाच्या एका भागावर हे घर बनलेले आहे. त्याचा दुसरा हिस्सा मात्र एकदम रिकामा आहे. नेपल्समध्ये राहणारे लोक या बेटाला कस्र्ड म्हणजे गूढ बेटसुद्धा म्हणतात. स्थानिकांच्या माहितीनुसार, या वाड्यात राहण्यासाठी जो कुणी जातो, त्याचा मृत्यू होतो. त्याच्या आधीच्या मालकाने तिथे आत्महत्या केली होती, तर दुसर्‍या मालकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा वाडा रिकामाच पडून आहे. गूढ असूनही तो पाहण्यासाठी बरेच लोक या बेटावर जातात. मात्र तिथे थांबण्याची हिंमत कुणीच दाखवत नाही. हे बेट नेपल्सच्या समुद्रकिनार्‍यापासून अतिशय जवळ आहे. त्यामुळे पोहणारी मंडळी अवघ्या पाच मिनिटांत तिथे पोहोचतात. असेही सांगितले जाते की, १९व्या शतकानंतर या बेटावर हा वाडा बांधण्यात आला होता. तत्पूर्वी तिथे एक कारखाना होता. मुख्य भूमीला जोडण्यासाठी १९२0मध्ये या बेटावर केबल कारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, पण लवकरच ती बंद करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi