Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टॉप टुरिस्ट ठिकाणांत पाच शहरांचा समावेश

टॉप टुरिस्ट ठिकाणांत पाच शहरांचा समावेश

वेबदुनिया

WD
खर्चाच्या दृष्टिकोनातून पर्यटकांना अनुकूल असणार्‍या जगातील 100 पर्यटन स्थळांच्या यादीत भारतातील पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यात महाराष्ट्रातील अलिबाग शहराचाही समावेश आहे. बेस्ट व्हॅलू इंडेक्स शहरांच्या यादीत नाशिक 21 व्या स्थानी असून येथे एक रात्र घालवणसाठी खर्च 5 हजार 665 रुपये इतका असू शकतो, असे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. नाशिक शहराला या वर्षी देशातील सर्वश्रेष्ठ पर्यटन अनुकूल शहर म्हणूनही स्थान मिळाले आहे.

या यादीत वरकाला हा केरळचा समुद्रकिनारा 28 व्या स्थानी असून राजस्थानातील जैसलमेरला 41 वे स्थान मिळाले आहे. अलिबागला 56 वे स्थान, तर केरळला 60 वे स्थान मिळाले आहे. ऑनलाइन हॉटेल सर्च वेबसाइट ट्रावेगोने हे सर्वेक्षण केले.

त्यासाठी त्यांनी 8.2 कोटी प्रवाशांनी भेट दिलेल ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्या आधारे शंभर पर्यटन ठिकाणांची यादी केली. ही शहरे पर्यटकांच्या विशेष पसंतीला उतरली.

Share this Story:

Follow Webdunia marathi