Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशातील टॉप 10 प्रमुख पर्यटनस्थळे

देशातील टॉप 10 प्रमुख पर्यटनस्थळे

वेबदुनिया

आग्रा

PR

जगातील सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट असलेला ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटक सर्वाधिक उत्सुक असतात. वीस हजार कारागिरांनी 22 वर्षे मेहनत घेऊन 1653 मध्ये या वास्तूचे काम पूर्ण केले.


जयपूर

webdunia
PR

राजस्थानमधील या गुलाबी शहर नवाने ओळखल्या जाणार्‍या ऐतिहासिक नगरीकडेही जगभरातील पर्यटक आकर्षित होत असतात. राजपुतांच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक किल्ले व महाल पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात.


गोवा

webdunia
PR

सुंदर समुद्रकिनार्‍याने नटलेला गोवा जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे अक्षरश: खेचून आणतो. गोव्यात येणारे 90 टक्के पर्यटक या सुंदर किनार्‍यांच्या आकर्षणानेच आलेले असतात.


काश्मीर

webdunia
PR

बादशाह जहाँगिरने ज्याला स्वर्गाची उपमा दिली त्या काश्मीरकडे देशविदेशातून अनेक पर्यटक आकर्षित होत असतात. तिथे 'ट्युलिप गार्डन' सारख्या नव्या आकर्षणांचीही भर पडली आहे.


कन्याकुमारी

webdunia
PR

हे भारताचे शेवटचे टोक. या ठिकारी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर अशा तीन समुद्रांचा संगम होतो. येथे कन्याकुमारी देवीचे मंदिर आहे तसेच विवेकानंद शिला स्मारक मंदिर आहे.


केरळ

webdunia
PR

केरळचे सृष्टीसौंदर्य, बॅकवॉटर ही देशविदेशातील पर्यटकांना खुणावत असतात. केरळचा मलबार किनारा देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे.


जुनी दिल्ली

webdunia
PR

नवी दिल्ली ही देशाची राजधानी आहे, मात्र जुन्या दिल्लीत अनेक ऐतिहासिक वास्तू असल्याने पर्यटक तिकडे खेचले जातात. या वास्तूंमध्ये लाल किल्ला, कुतुबमिनार आणि ह्युमायूनच्या कबरीचा समावेश आहे.


अजिंठा-वेरूळ

webdunia
PR

प्राचीन काळातील सुंदर लेणी आणि चित्रकला पाहण्यासाठी जगभरातील लोक अजिंठा-वेरूळला येत असतात. मानवी कलेचा उत्कट आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळतो.


दार्जिलिंग

webdunia
PR

थंड हवेचे ठिकाण म्हणून जुन्या काळापासूनच दार्जिलिंगची पर्यटकांना ओढ वाटते. तेथील उत्तुंग पर्वत, नयनरम्य सृष्टीसौंदर्य आणि शुद्ध, ताजी हवा पर्यटकांना हवहवीशी वाटते.


म्हैसूर

webdunia
PR

ऐतिहासिक म्हैसूर शहरातील शाही सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. विशेषत: दसरा महोत्सवावेळी या शहरात जगभरातून पर्यटक येतात. त्यावेळी दहा दिवस म्हैसूर शहर पर्यटकांनी गजबजून गेलेले असते. तेथील अंबाविलास (म्हैसूर) पॅलेस पाहणे, हा एक आनंददायी अनुभव असतो.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi