Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेपाळकडे पर्यटकांचा ओघ

नेपाळकडे पर्यटकांचा ओघ

वेबदुनिया

WD
नेपाळने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. संपूर्ण वर्षात 1 मिलिनियन पर्यटक नेपाळमध्ये यावे म्हणून नेपाळ टुरिजम बोर्डाने विशेष योजना आखली आहे. इतर देशांच्या तुलनेत लागतचा देश म्हणून भारतात खास कॅम्पेन हाती घेतले आहे. शांतता आणि स्‍थैर्य प्रस्थापित झाल्यानंतर आता नेपाळने पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधण्यावर भर दिला आहे. कोणत्याही व्हिजाशिवाय सहज प्रवेश मिळवता येईल, अशी सोय असलेल्या नेपाळने पर्यटकांची प्रमुख बाजारपेठ म्हणून भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. विमान, रेल्वे किंवा बसने भारतातून नेपाळमध्ये जाता येत. येथून जास्तीतजास्त पर्यटकांनी नेपाळमध्ये यावे, यासाठी नेपाळ सरकारने टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स यांच्याशी करार केले आहेत.

नेपाळमध्ये काठमांडूतील पशुपतीनाथ मंदिर, जोमसोमचे मुक्तिनाथ मंदिर, जनकपूर येतील रामजानकी मंदिर, गोरखाचे मनोकामना मंदिर, पवित्र कैलास मानसरोवर प्रवेशद्वार आदी धार्मिक स्थळांसोबतच भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेले लुंबिनी तसेच हिमालयाचे अप्रतिम निसर्गसौंदर्य नेपाळमधून बघता येते. हलक्या वसजनाच्या विमानातून सफर, जंगल सफर, पर्वतातून विमानोड्डाण, गिरीभ्रमण, काठमांडू, पोखरा ही लेकसिटी आदींसह येथे बाराही महिने पाहण्यासारखे असते. विविध धार्मिक सणांसह नेपाळमध्ये वर्षभरात पाचशेहून अधिक विशेष कार्यक्रम, महोत्सव साजरे केले जातात.

आगामी काळात ग्याल्पो ल्होसार, फागू पौर्णिमा, घोडे जत्रा आणि राम नवमी नेपाळी नववर्ष तसेच भक्तपूर बिस्केत जत्रा हे महोत्सव साजरे होणार आहेत.


Share this Story:

Follow Webdunia marathi