Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्लॅनिंग फॉर ट्रॅव्हलिंग

प्लॅनिंग फॉर ट्रॅव्हलिंग

वेबदुनिया

WD
उन्हाळाच्या सुट्या सुरू होण्याचा अवकाश, की कुठेतरी आऊटिंग करण्याचा प्लॅन ठरतो आणि बॅग्ज भरायला सुरुवात होते. इथेच खरी मेख असते. प्रवासात किती सामान घ्यावे, किती मोठी बॅग घ्यावी याचा विचार अगदी आयत्या वेळेस केला जातो. खरं तर प्रवासाची बॅघ आणि त्यातले सामानही प्रवासातइतकीच महत्त्वाची बाब, पण त्याकडे दुर्लक्ष होतंच.

तुम्ही कितीही दिवसांचा दौरा आखा, चार दिवसांची ट्रिप की 15 दिवसाचा दौरा. प्रवासात लागणार्‍या सामानाचं नियोजन हवंच. काहीजणांना असे वाटते की, कोणतंही प्लॅनिंग न करता प्रवास करण्यातच खरी मजा आहे. काही वेळा ते खरेही असते, पण एप्रिल, मे अशा ऐन सुट्टीच्या दिवसात बेभरवशाचं प्लॅनिंग करणे अंगावर येऊ शकतं. एकतर सुट्टांमुळे अनेक पर्यटनस्थळांच्या ठिकाणाची हॉटेल्सची बुकिंग फुल असतात. रिझर्व्हेशन्सही उपलब्द नसतात. त्यामुळे लांबच्या प्रवासात बसायला जागा मिळेल याची शाश्वती नाही. म्हणूनच सुट्टांच्या मोसमात 'अ‍ॅडव्हेंचर्स प्लॅनिंग' न करणेच शहाणपणाचे!

अनेकांना ट्रॅव्हलिंग शेड्युल ठरवायचाही कंटाळा येतो. तिथं गेल्यावर ठरवू असा विचार काही कामाचा नसतो. बर्‍याचदा आपण ज्या शहराला भेट देणार असतो, त्या शहराच्या वैशिष्टयांमध्ये काळाप्रमाणे काही बदलही झालेला असतो, त्याची नीट माहिती असणे केव्हाही चांगलेच. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जायचे आहे तिथल्या हवामानाविषयीही नीट माहिती असणे केव्हाही चांगलेच.

फिरायला जाताना जे बरोबर आहेत त्या सर्वांच्याच आवडी-निवडीचाही नीट विचार करा. तुमच्याबरोबर जर वयस्क किंवा लहान वयाचे कुणी असेल, तर त्यांना खूप धावपळ जमणार नाही, हे ध्यानात घ्या. तुमचा पासपोर्ट, तिकीट, काही पैसे असे सारे हाताशी ठेवा. सामान सोडून कुठे जाऊ नका किंवा अनोळखी व्यक्तीने तुमच्याकडे काही ठेवायला दिले तरी त्याचा स्वीकार करू नका.

एकूणच पिक सिझनमध्ये प्रवास करताना सर्व गोष्टी ध्यानात घेऊन योग्य नियोजन करून मगच बेत आखा. उचलली बॅग, लावली पाठीला आणि निघाले प्रवासाला हे या सीझनमध्ये तरी टाळाच.

Share this Story:

Follow Webdunia marathi