Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वित्झरर्लंड: स्वर्गीय अनुभूती

स्वित्झरर्लंड: स्वर्गीय अनुभूती

वेबदुनिया

स्वित्झरर्लंड युरोपमधील सर्वांत सुंदर देश... येथील घड्याळे आणि चॉकलेट विश्वविख्यात आहेत. येथील हवा खूपच थंड असते. बर्फाच्छादित डोंगर, चारही बाजूंनी व्यापलेली हिरवळ, रंगीबेरंगी फुलांच्या बागा, मधुर आवाजात गाणारे पक्षी, स्वच्छ-सुंदर रस्ते आणि निसर्गसौंदर्याने बहरून गेलेली पर्यटनस्थळे, यामुळे 'स्वित्झरलंड'पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनले आहे.

WD


येथील 'राईन फॉल'हे पाहण्याजोगे पर्यटनस्थळ आहे. रेल्वेने विंटरथर जाऊन तेथून दुसरी रेल्वे पकडून 'राईन फॉल' येथे जाता येते. या प्रवासातही निसर्गसौंदर्य पाहताना खूपच मजा येते. सुंदर, छोटी-छीटी आणि विशेष म्हणजे स्वच्छ गावे, सगळीकडे हिरवळ आणि त्यामध्ये चरणा-या गाई हे दृश्य पाहताना मन प्रसन्न होऊन जाते. घाटमाथ्यातून गाडी धावू लागली की 'राईन फॉल'आल्याची जाणीव होऊ लागते. रेल्वेतून उतरताच समोर निसर्गसौंदर्याने बहरून गेलेला नजरा दिसतो. धबधब्यांचे जोरदार आवाज, अंगावर उडणारे पाण्याचे तुषार अनुभवत घाटात खाली उतरण्यासाठी पायवाट आहे. घनदाट जंगलातून हा रस्ता गेला आहे. काही अंतर चालल्यावर समोर युरोपातील सर्वांत मोठ्या 'राईन फॉल'दृश्य दिसते आणि आपण थक्क होऊन जातो. पाण्याचे तुषार, त्यावर कोवळे उन्ह पडताच निर्माण होणारे इंद्रधनुष्य, पाहतच बसावेसे वाटते.

पुढे पाहा ज्यूरिख....


webdunia
PR


येथून रेल्वेने ज्यूरिखला जाता येते. येथील स्विस भोजनाचा स्वाद काही औरच आहे. याठिकाणी मोठे शॉपिंग मार्केट आहे. विशेष करून ज्यूसेस, फ्रूट्स आणि ब्रेडस मिळतात. एक दिवसाच्या मुक्कामानंतर लूजर्नला जाता येते. येथे जाणा-या रेल्वे कमालीच्या फास्ट असतात. स्वच्छ, आरामदायी असण्याबरोबरच बाहेरील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असल्याने कितीही मोठा प्रवास असला तरी थकवा जाणवत नाही. लूजर्नमध्ये राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आहेत. याठिकाणी प्रसिद्ध लेक लूजर्न आणि चॅपल ब्रिज पाहण्यासारखे आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी सेंट पीटर चॅपल यांच्या नावाने हा ब्रिज चौदाव्या शतकात बांधण्यात आला आहे. हा पुल पूर्णपणे लाकडाचा आहे, हे विशेष. दोन्ही बाजूस रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. वरून पॅक असणा-या या पुलाच्या आतील भागात लूजर्न शहराचा इतिहास सांगणारी चित्रे आहेत.

पुढे पाहा माउंट पीलेटस...


webdunia
PR


याठिकाणी 'माउंट पीलेटस' हे खास आकर्षण असणारे स्थळ आहे. लेक लूजर्न येथून बोटीने जाता येते. हा प्रवासातही समुद्राकाठचे निसर्गसौंदर्य आल्हादकारक आहे. बीचवरील सुंदर गावे, डोंगर, हिरवळ पाहता पाहता कॉगविल कधी येते ते समजतच नाही. येथून पुडे रेल्वेने प्रवास करावा लागतो. ही रेल्वे उंचच उंच टेकड्या आणि खोल द-यांमधून धावते. विशेष म्हणजे जगातील सर्वांत चढावरून धावणारी ही रेल्वे आहे. द-याखो-यातून 'माउंट पीलेटस' मध्ये पोहोचल्यावर येथील दृश्य पाहताना स्वर्गीय अनुभूती होते. येथे एक दिवस थांबून धम्माल करता येते. घाटातून रेल्वेप्रवास करण्याचा अनोखा अनुभव घेल्यानंतर खाली उरण्यासाठी केबल कारचा अनुभवही रोमांचकारक आणि कायम स्मरणात राहण्यासारखा आहे. कारण ७००० फूट उंचीवरून आपण काही मिनिटांत खाली येतो.

पुढे पाहा इंटरलाकन....


webdunia
PR


इंटरलाकन हे पाहण्याजोगे आहे. येथील आल्पस पर्वर्तरांगामधील जुंगफ्राउ हे स्थळ पाहण्यासारखे आहे. युरोपमधील सर्वांत उंच म्हणूनही याची ख्याती आहे. सुमारे ११ हजार ३३३ फूट एवढ्या उंचीवर जायचे म्हटले तर अंगावर काठा उभा राहतो पण, येथे जाण्यासाठीही आरामदायक रेल्वे आहे आणि निसर्गसौंदर्य पाहताना आपण याठिकाणी कधी पोहोचलो तेच समजत नाही. इंटरलाकनपासून 'जुंगफ्राउ'हा सुमारे अडीज तासांचा प्रवास आहे. पण, शेवटचा तासभरच्या प्रवासात रेल्वे बर्फाच्छादित पर्वतांतून धावत असते, हा नजारा शब्दात व्यक्त करता न येणारा आहे.

पुढे पाहा व्हू पॉंईंट्स


webdunia
WD


जुंगफ्राउ पीकवर 'व्हू पॉंईंट्स' आहेत. येथील स्फींक्स ऑब्जर्वेशन हॉल आणि टेरेस पाहताना आपण थक्क होऊन जातो. आईस पॅलेसही पाहण्यासारखा आहे. जिकडे बघाल तिकडे बर्फाने व्यापून टाकलेला परिसर, सुर्यकिरणे पडतात चकाकून जाणारी शिखरे, त्यामध्ये स्कीइंग करताना मुंग्यांसाखरे दिसणारे लोक पाहताना वेगळीच मजा येते. खरोखरच येथून पायच निघत नाही. उंचीवर बॉलीवूड रेस्टॉरंट आहे. याठिकाणी भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतानाचा अनुभवही काही औरच आहे. भारतीयांबरोबरच युरोपीय लोकही या भोजनाचा आस्वाद घेताना दिसतात.

पुढील पानावर पाहा मॉंत्रो


webdunia
PR


इंटरलाकन पासून मॉंत्रोला जाता येते. या तीन तासांच्या प्रवासासाठी पारदर्शत रेल्वे आहे. या पेनोरेमिक ट्रेनमधून प्रवास करण्याचा अनुभही सुखद आहे. मॉंत्रोमधील जिनेवा लेक प्रसिद्ध आहे. याला स्विस रिविएराही म्हटले जाते. याठिकाणी जास्तकरून फ्रेंच बोलली जाते. येथील ओल्ड टॉउन फ़्रेंडी मर्क्युरी मेमोरियल, केसल चिलिया ही स्थळे पाहण्यासारखी आहेत. येथून 'चॉकलेट ट्रेन' आपल्याला ग्रुएरला घेऊन जाते. येथील गावांमध्ये चीज बनविले जाते. म्हणूनच याला चीज मेकिंग टाउनही म्हटले जाते. याच मार्गावर येणा-या 'ब्रोक' येथे जगविख्यात नेस्लेची चॉकलेट फॅक्टरी आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi