Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

12 Jyotirlingas 12 ज्योतिर्लिंग आणि त्याचे वैशिष्टये

mahashivratri
, रविवार, 31 जुलै 2022 (10:07 IST)
एखाद्या भक्ताने श्रद्धेने आणि शांत मनाने भगवान शंकराची पूजा केली आणि काही मागितले तर शंकर त्याची इच्छा पूर्ण करतात. भाविक भोलेनाथाची पूजा करतात.बेलाची पाने वाहून दुधाने रुद्राभिषेक करता. प्रत्येक मंदिरात शिवलिंग असते. पण देशात 12 ज्योतिर्लिंगे आहेत. येथे भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात येऊन स्थिरावले होते. या 12 ज्योतिर्लिंगाचे वैशिष्टये आहेत. चला तर मग हे ज्योतिर्लिंग कोठे आहेत आणि या ज्योतिर्लिंगांची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेऊ घ्या.
 
1 सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात
देशातील पहिले ज्योतिर्लिंग सौराष्ट्र, गुजरात येथे आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या या ज्योतिर्लिंगाचे नाव सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. पुराणानुसार प्रजापती दक्षाने चंद्राला क्षयरोगाचा शाप दिला तेव्हा याच ठिकाणी चंद्राने शिवाची पूजा केली आणि शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी तपश्चर्या केली. या ठिकाणी स्वतः चंद्रदेवांनी ज्योतिर्लिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते.
2 मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेश
दुसरे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम पर्वतावर स्थित आहे. आंध्र प्रदेशात असलेल्या या ज्योतिर्लिंगाचे नाव मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग असे आहे.
3 महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन, मध्य प्रदेश येथे आहे. या ज्योतिर्लिंगाजवळ क्षिप्रा नदी वाहते. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. येथे दररोज भस्म आरती होते, जी जगभर प्रसिद्ध आहे
4 ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश 
मध्य प्रदेशात दोन ज्योतिर्लिंगे आहेत. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशिवाय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे माळवा प्रदेशात नर्मदा नदीच्या काठावर डोंगरावर वसलेले आहे. भाविकांनी इतर तीर्थक्षेत्रातून पाणी आणून ओंकारेश्वर बाबांना अर्पण केल्यास त्यांची सर्व तीर्थे पूर्ण होतात, असा समज आहे.
5 केदारनाथ ज्योतिर्लिंग, उत्तराखंड
केदारनाथ धाम हे उत्तराखंडच्या चार धामांपैकी एक आहे, जेथे केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या काठी केदार शिखरावर वसलेले आहे. हे भगवान शंकराचे घर मानले जाते.
6 भीमाशंकर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र 
महाराष्ट्रात तीन ज्योतिर्लिंगे आहेत, पहिले पुण्यापासून 100 किमी अंतरावर डाकिनी येथे आहे. त्याला भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणतात. या शिवलिंगाचा आकार बराच जाड आहे, म्हणून त्याला मोटेश्वर महादेव असेही म्हणतात.
7 विश्वनाथ ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश
विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशच्या पवित्र वाराणसीमध्ये विराजमान आहे. या ठिकाणाला धर्म नगरी काशी असेही म्हणतात जे भगवान भोले नाथांचे प्रिय मानले जाते. गंगा नदीच्या काठावर बाबा विश्वनाथाचे मंदिर आहे. असे म्हणतात की भगवान शिवांनी कैलास सोडले आणि काशीत कायमचे वास्तव्य केले.
8 त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र 
महाराष्ट्रात आणखी एक ज्योतिर्लिंग आहे, ज्याला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणतात. हे नाशिकच्या पश्चिमेस 30 किमी अंतरावर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. काळ्या दगडांनी बनवलेल्या या मंदिराबाबत असे मानले जाते की गौतम ऋषी आणि गोदावरीच्या प्रार्थनेवरून भगवान शिव या ठिकाणी वसले होते.
9 वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, झारखंड
बैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवघर, झारखंड येथे आहे. या मंदिराला बैद्यनाथधाम म्हणतात. त्याला रावणेश्वर धाम असेही म्हणतात.
10 नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात
सोमनाथ व्यतिरिक्त नागेश्वर ज्योतिर्लिंग देखील गुजरातमध्ये आहे. बडोदा जिल्ह्यातील गोमती द्वारकेजवळ असलेल्या या मंदिराविषयी असे सांगितले जाते की भगवान शंकराच्या इच्छेमुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर असे पडले.
11 रामेश्वरम ज्योतिर्लिंग,तामिळनाडू
11 वे ज्योतिर्लिंग तामिळनाडूमधील रामनाथमच्या ठिकाणी वसलेले आहे. तामिळनाडूमध्ये रामेश्वरम ज्योतिर्लिंग आहे, अशी आख्यायिका आहे की लंकेवर हल्ला करण्यापूर्वी भगवान रामाने शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे याला रामेश्वर असे नाव पडले.
12 घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील तिसरे ज्योतिर्लिंग आणि भगवान शिवाचे 12 वे ज्योतिर्लिंग हे संभाजीनगरजवळील दौलताबाद येथे स्थित घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाला घुष्मेश्वर असेही म्हणतात.
ALSO READ: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग Grishneshwar Jyotirlinga Temple

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'पठाण' नंतर दीपिका पदुकोणही दिसणार शाहरुखच्या आगामी चित्रपटात