Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमर सागर सरोवर राजस्थान

Amar Sagar Lake
, बुधवार, 15 जानेवारी 2025 (07:30 IST)
India Tourism: राजस्थानमधील जैसलमेर मध्ये अमर सागर नावाचे सरोवर आहे. हे सरोवर जैसलमेरच्या पश्चिम सीमेपासून काही अंतरावर आहे. 17व्या शतकात बांधलेल्या अमर सिंह पॅलेसच्या शेजारी असलेले हे एक सरोवर आहे.
ALSO READ: पटवांची हवेली जैसलमेर
तसेच या तलावाभोवती दगडांवर कोरलेल्या असंख्य प्राण्यांचे नक्षीकाम आहे, ज्या राजघराण्याचे रक्षक असल्याचे मानले जाते. तसेच एका बाजूला तळ्याकडे जाणाऱ्या पायऱ्या असलेले मंडप दिसतात, तर दुसऱ्या बाजूला कोरलेले जैन मंदिर आहे. हे अमर सागर सरोवर हे एक अद्भुत ठिकाण असून जिथे पर्यटक सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी अमर

अमर सागर सरोवर इतिहास-
अमर सागर सरोवर हे एक सुंदर कृत्रिम तलाव असून 17व्या शतकात महारावल अखाई सिंह यांनी बांधले होते. तसेच स्थानिक आख्यायिकेनुसार, महारावल अखाई सिंह हे त्यांची राणी अमर देवी यांच्यावर खूप प्रेम करत होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे सरोवर बांधले. त्यांच्या सन्मानार्थ या सरोवराचे नाव अमर सागर ठेवण्यात आले. या सरोवराभोवती अनेक सुंदर मंदिरे आणि राजवाडे आहे, ज्यात महारावल अखाई सिंह यांनी बांधलेला अमर सिंह पॅलेस देखील आहे. तसेच या राजवाड्याच्या संकुलात छत्री असलेल्या असंख्य विहिरी आणि तलाव आहे. असे मानले जाते की या विहिरी वेश्यांनी बांधल्या होत्या. अमर सिंह हे भगवान शिवाचे अनुयायी असल्याचे मानले जाते. म्हणून, 18व्या शतकात संगमरवरी दगडापासून बनवलेले एक प्राचीन शिवमंदिर बांधले गेले. राजवाड्याच्या शेजारी पायऱ्या आणि तलावाकडे जाणारा मंडप आहे. तलावाच्या शेवटच्या टोकाला, एक सुंदर कोरीव काम केलेले जैन मंदिर आहे. या तलावाचा एक रोमांचक भाग म्हणजे दगडात कोरलेल्या मूर्ती ज्या राजघराण्याचे रक्षण करतात असे मानले जाते.अमर सागर सरोवराला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक जैसलमेर मध्ये दाखल होतात.  

अमर सागर सरोवर जैसलमेर जावे कसे?
विमान मार्ग-जोधपूर विमानतळ हे जवळचे देशांतर्गत विमानतळ आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि उदयपूर सारख्या प्रमुख शहरांमधून जोधपूरला नियमित विमानसेवा उपलब्ध आहे.जैसलमेरला पोहोचल्यानंतर टॅक्सी किंवा कॅबने अमर सागर सरोवर येथे पोहचता येते.

रेल्वे मार्ग- ट्रेनने जायचे असेल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन जैसलमेर आहे जे अमर सागर तलावापासून 8 किमी अंतरावर आहे. ट्रेनने प्रवास करून जैसलमेर रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकता आणि तेथून टॅक्सी किंवा कॅबने अमर सागर तलावावर पोहोचू शकता.

रस्ता मार्ग-जैसलमेर हे राजस्थानातील सर्व प्रमुख शहरांशी रस्त्याने जोडलेले आहे. त्यामुळे बस, कार किंवा टॅक्सीने प्रवास करून जैसलमेरला पोहोचू शकता. अमर सागर सरोवर 8 किमी अंतरावर असलेल्या तुम्ही सहज पोहचू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हृतिक रोशनच्या 'कहो ना प्यार है' चित्रपटाला बॉलिवूडमध्ये झाले 25 वर्षे पूर्ण