Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतातील विलक्षण अद्वितीय गांवे

kasol village
, शनिवार, 10 डिसेंबर 2022 (12:41 IST)
1) आळंदी गाव
आळंदी या गावात आजही (गाव वेशीत) मास - मटण मिळत नाही या गोष्टीला 700 वर्षे पूर्ण झालीत.
 
2) शनि शिंगणापूर (महाराष्ट्र)
संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.
 
3) शेटफळ (महाराष्ट्र)
प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य असल्या सारखी सर्पराजाची उपस्थिती.
 
4) हिवरे बाजार (महाराष्ट्र)
भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे. ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही. सर्वाधिक GDP असणारं खेडं.
 
5- पनसरी (गुजरात)
भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव. गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून, Wi-Fi सुविधाही आहेत. गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात.
 
6) जंबुर (गुजरात)
भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक "आफ्रिकन" वाटतात. [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]
 
7) कुलधारा (राजस्थान)
"अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही. घरे बेवारस सोडलेली आहेत.
 
8) कोडिन्ही (केरळ)
जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.
 
9) मत्तूर (कर्नाटक)
दैनंदिन व्यवहारासह सगळ्या कामकाजासाठी "संस्कृत" भाषेचा वापर करणारे 10,000 वस्तीचे गांव.
 
10) बरवानकाला (बिहार)
ब्रम्हचाऱ्यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून गांवात लग्न सोहळाच नाही.
 
11) मॉवलिनॉन्ग (मेघालया)
'आशिया'खंडातील सर्वात "स्वच्छ" गांव. पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग शिल्प.
 
12) रोंगडोई (आसाम)
बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो, अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव. असं लग्न हा 'ग्रामसण'च असतो.
 
13) कोर्ले गांव, रायगड जिल्हा (महाराष्ट्र)
Korlai village स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगीज गेल्यानंतरही "पोर्तुगीज:" भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.
 
14) मधोपत्ती गाव (उत्तर प्रदेश)
एका गावातून ४६ पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव, ९० % पेक्षा जास्त सरकारी नोकरी मध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे...
 
15) झुंझनु (राजस्थान)
फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती...६ हजार पेक्षा जास्त सेवा निवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू...
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Celebrity deaths in 2022 लता दीदींपासून ते राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला