Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतातील या चार मंदिरात प्राण्यांची पूजा केली जाते, जाणून घ्या माहिती

भारतातील या चार मंदिरात प्राण्यांची पूजा केली जाते, जाणून घ्या माहिती
, शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (15:01 IST)
भारत हा एक असा देश आहे, जिथे लोक विविध रितीभातींना मानतात आणि आपल्या धर्म आणि आस्थानुसार ते मंदिरांत पूजा-पाठ करतात.
 
अशाच एका मंदिरा बद्दल सांगत आहोत, जिथे देवाची नाही तर प्राण्यांची पूजा करतात.  या मंदिरात लोक प्राण्यांना श्रद्धाभाव ने पाहिले जाते. त्यामागे काही आख्यायिका देखील आहे. येथे असणारे प्राणी देखील लोकांना नुकसान पोहोचवत नाही. चला तर मग जाणून घेऊ या, या काही मंदिरांची माहिती. 
 
1 डॉग टेम्पल, कर्नाटक- हे डॉग टेम्पल कर्नाटकाच्या रामनगर जिल्ह्याच्या चन्नापटना मध्ये स्थित आहे. या मंदिराची निर्मिती वर्ष 2010 मध्ये एक व्यवसायिका द्वारे केली गेली. हा  व्यवसायिकाने केम्पम्मा मंदिराची निर्मिती केली , हे मंदिर ग्रामदेवी केम्पम्मा यांना समर्पित आहे.एका आख्यायिकेनुसार, मंदिराची स्थापना होत असताना  ग्राम देवी केम्पम्मा यांनी दोन कुत्र्यांना शोधण्याचा आदेश ग्रामस्थांना  केला होता, जे पूर्वी गावातून गायब झाले होते, जेणे करून मंदिराला वाईटापासून वाचवता येईल. 
 
ग्रामीणांना ते कुत्रे मिळाले नाही, म्हणून त्यांनी एक मंदिर बनवले आणि मंदिरात दोन कुत्र्यांच्या मुरत्या स्थापित केल्या. एका आख्यायिकेनुसार, ग्रामस्थांनी या डॉग टेंम्पल मंदिराचा निर्माण करून कुत्र्यांची माणसांच्याप्रति एकनिष्ठेच्या भावनेला समर्पित केले आहे.  
 
2 भालू मंदिर - छत्तीसगढ़- छत्तीसगढ़ मध्ये चंडी माता मंदिर आहे. हे मंदिर बऱ्याच गोष्टींसाठी विशेष आहे. छत्तीसगडच्या या महासमुंदाच्या या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की, या मंदिरात आरतीच्या वेळी काही भालू (अस्वल) येतात आणि इथल्या पुजाऱ्याकडून प्रसाद घेऊन खातात. आणि या मंदिराच्या नऊ प्रदक्षिणा लावून परत निघून जातात. विशेष म्हणजे की, या मंदिरात येणारे भालू कधीही कुणाला त्रास देत नाही. या मंदिरात येणाऱ्या भालूंच्या उपस्थितीमुळे या चंडी माता मंदिराला भालू मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. 
 
3 मंकी मंदिर - जयपुर- राजस्थानच्या जयपूरच्या टेकड्यांमध्ये गलताजी यांचे मंदिर आहे. इथे भाविक पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी येतात. या परिसरात रामगोपालजी नावाचे मंदिर आहे, या मंदिरात माकड मोठ्या संख्येने येतात. मंदिरात माकडांच्या उपस्थितीमुळे या मंदिराला माकडाचे मंदिर किंवा बंदर मंदिर म्हटले जाते. माकडाला मारुती(हनुमानाचे) रूप मानतात, म्हणून लोक या माकडांना सन्मान  देतात. 
 
4 मन्नरसला नागराज मंदिर - हरिपद,केरळ -केरळच्या हरिपद येथे मन्नरसला नागराज मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन आहे आणि हे मंदिर नागदेवाला समर्पित आहे.  हे मंदिर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. हे मंदिर भारताच्या केरळ राज्यात आपले एकमेव मंदिर आहे. या मंदिरात सुंदर सापाच्या मुरत्या नक्काशी केलेल्या आहेत. मन्नरसाच्या मंदिराच्या वाटेवर आणि झाड्यांवर सापाच्या  100,000 नक्काशी कोरलेल्या आहे. 
या मंदिराच्या भेटीला दूरवरून भाविक येतात. पण अपत्य प्राप्तीची इच्छा करणारे दाम्पत्य येथे आवर्जून भेट देतात. आणि अपत्यप्राप्तीसाठी पूजा करतात. अपत्यप्राप्ती झाल्यावर ते बाळाला घेऊन येथे येतात आणि सापांच्या मुरत्या इथे प्रसाद स्वरूपात अर्पण करतात. 
 
   
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुशांत सिंग राजपूतचा जन्म मोठ्या नवसांनी झाला, लहान वयातच खूप प्रसिद्धी मिळवली