कुटुंबासोबत मस्तपैकी फिरायला जायला, रिलॅक्स व्हायला प्रत्येकालाच आवडतं. काहींना हिल स्टेशन आवडतात तर काहींना समुद्रकिनारे खुणावतात. तुम्हाला समुद्राच्या लाटांवर स्वार व्हायला आवडत असेल तर या ड्रीम डेस्टिनेशन्सचा विचार करा.
* अंदमान-निकोबारमधल्या हॅवलॉक बेटांपासून साधारण 12 किमी अंतरावर राधानगर बीच आहे. या बीचवरील शांत वातावरण आणि मस्त हवामान यामुळे इथे पर्यटकांची गर्दी असते. राधानगर हा जगातल्या सर्वोत्कृष्ट बीचपैकी एक आहे.
* गोवा हे अनेकाचं फेवरिट डेस्टिनेशन असतं. दक्षिण गोव्यात फिरतं असाल तर अगोंदा बीचवर नक्की जा. सोनेरी वाळू आणि निळ्याशार समुद्राच्या साक्षीने सुटी इंजॉय करायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
* गोव्यातला केवलोसीम बीचही खूप सुंदर आहे. या ठिकाणी पांढरी वाळू पाहायला मिळते. हा समुद्रकिनारा मोठा आणि शांत आहे.
* दक्षिण केरळमधला वर्कला बीच खास आकर्षण मानला जातो. या ठिकाणी अरबी समुद्रालगत मोठे मोठे खडक आहेत.
* शांतपणे पहुडायचं असेल तर गोव्यातला बेनोलीम बीचवर जाता येईलं. इथला कँडोलीम बीचही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या तुलनेनं कमी असल्याने शांतता अनुभवता येते.
* ओरिसातल्या पुरीमधील बीचही खूप सुंदर आहे. जगन्नाथ पुरी हे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. या ठिकाणी आल्यावर पुरी बीचला नक्की भेट द्या.
* अंदमान-निकोबार बेटांवरच्या एलिफंटा बीचला नक्की भेट द्या. इथे खूप धमाल करता येते.
पणजीपासून 50 किमीवरील अरंबोल बीचवर शांतता अनुभवता येते. इथपर्यंत येण्याचा मार्गही खूप सुंदर आहे.
* अलिबागजवळीक नगांव बीचदेखील रमणीय आणि शांत आहे.