Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट टॉप हिल स्टेशन शिलॉंग मेघालय

उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट टॉप हिल स्टेशन शिलॉंग मेघालय
, मंगळवार, 1 जून 2021 (19:22 IST)
हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या,लांब,सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल,सातपुडाचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत,भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत. चला भारतातील शीर्ष हिल स्टेशन पैकी एक शिलॉंग हिल स्टेशन बद्दल जाणून घेऊ या.
 
शिलॉंग मेघालय-
 
1 मेघालय म्हणजे ढगांचे घर. इथं आल्यावर जीवनाच्या सर्व चिंता संपतात.येथे बरीच हिल स्टेशन आहेत. शिलॉंग त्यापैकी एक आहे.
 
2 मेघालयाची राजधानी शिलाँग हे भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे.त्याला पूर्वेकडील स्कॉटलंड म्हणतात.
 
3 शिलॉंग मध्ये जगातील सर्वांत उंच धबधबा आहे.हे बघण्यासाठी जगभरातील लोक येतात.
 
4 सुंदर टेकड्यांच्या मध्ये वसलेले हे ठिकाण भारतातील प्रसिद्ध ब्लूस मैन,लाऊ मैजा(गायक आणि गिटारवादकाचे )घर देखील इथेच आहे.
 
5 शिलॉंग मध्ये अणे प्रेक्षणीय स्थळे आहेत जसे की एलिफेंटाफॉल, शिलॉंग व्ह्यू पॉईंट,लेडी हैदरी पार्क,वार्ड्स लेक,गोल्फ फोर्स, संग्रहालय, केथोलिक,केथेड्रल,आर्चरी आणि अँग्लिकन सिमेंटरी चर्च.
इत्यादी.
 
6 चेरापुंजीचे स्थानिक व अधिकृत नाव सोहरा आहे जे शिलाँगपासून  56 किमी अंतरावर आहे. हे खासी टेकडीच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले एक छोटेसे शहर आहे. अवघ्या 12 महिन्यांपासून सतत मुसळधार पावसामुळे चेरापुंजी जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
 
7 चेरापुंजीचे काही महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे माकडॉक-डिमपेप खोऱ्याचे दृश्य जे शिलॉंग आणि चेरापुंजीच्या मध्यात आहे.सोहरा बाजार आणि रामकृष्ण मंदिर,संग्रहालय,नोखालीकाई धबधबा,प्रथम प्री सायबेरियन चर्च,वेल्श मिशनरींच्या दर्गा,अँगलिंकन सिमेंटरी,इको पार्क,डबल डेकर रूट ब्रिज,चेरापुंजी हवामान शास्त्रीय वेधशाळा. इत्यादी .
शिलॉंग पासून 35 किमी दूर अमरोही विमानतळ आहे. दिल्ली पासून सुमारे 1490 किमी च्या अंतरावर शिलॉंग आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्नीला मारहाण : या अभिनेत्याला अटक