Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

भस्म होळी वाराणसी, जिथे रंगांऐवजी चितेच्या राखेने होळी खेळली जाते

Masan Holi varansi
, बुधवार, 19 मार्च 2025 (07:30 IST)
India Tourism : होळी हा प्रामुख्याने रंगांचा सण आहे. पण भारतात अशी काही ठिकाणे आहे जिथे होळीचा उत्सव नेहमीच्या रंगांनी साजरा केला जात नाही तर तो वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. होळी ही एका खास आणि विचित्र पद्धतीने साजरी केली जाते. काशी शहरातील अनोख्या होळीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जिथे रंगांऐवजी चितेच्या राखेने होळी खेळली जाते. जिला भस्म होळी वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर साजरी केली जाते, जिथे होळी असे देखील संबोधले जाते. तसेच ही होळी रंगांनी नाही तर चितेच्या राखेने खेळली जाते. तर चला भस्म होळीशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये जाणून घेऊया.
ALSO READ: Holi 2025 विशेष मार्चमध्ये भेट देण्यासाठी तीन सर्वोत्तम ठिकाणे
अमळकी एकादशीपासून उत्सवास सुरवात-
पौराणिक आख्यायिकानुसार भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या विवाहानंतर देवी पार्वतीचा गौण सोहळा फाल्गुनच्या एकादशीच्या दिवशी झाला आणि ती त्याच्यासोबत शिवाच्या नगरीत आली. हा आनंद व्यक्त करण्यासाठी आजही भगवान शिवाच्या काशी नगरीत आमलकी एकादशीच्या दिवशी उत्सव साजरा केला जातो. या प्रसंगाचा आनंद व्यक्त करण्यासाठी, बाबांची पालखी काशीच्या रस्त्यांवर काढली जाते आणि सर्वत्र रंगीबेरंगी वातावरण असते, परंतु दुसऱ्या दिवशी हे रंगीत दृश्य पूर्णपणे बदलते.

webdunia
भस्म होळी खेळी जाते-
भगवान शिव यांना स्मशानभूमीचे देवता देखील मानले जाते. असे म्हटले जाते की शिव हे विश्वाचे नियंत्रक आणि संहारक आहे. याकरिता स्मशानभूमीत भगवान शिवाची मूर्ती निश्चितच स्थापित केली जाते. संपूर्ण काशी शहरात एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी शिवाला समर्पित चितेच्या राखेची होळी खेळली जाते. तसेच एक पौराणिक मान्यता आहे की भगवान शिवाचे भयंकर रूप दर्शविण्यासाठी, काशीतील मणिकर्णिका घाटावर होळीचे रंग म्हणून चितेच्या राखेचा वापर केला जातो. लोक चितेची राख एकमेकांवर लावतात आणि 'हर हर महादेव' जयघोष करतात. तसेच ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण दृश्य अद्वितीय दिसते. दरवर्षी होळीच्या सणात काशीमध्ये हे दृश्य पाहावयास मिळते.
ALSO READ: होळी दहनाचा जाणून घ्या इतिहास
तसेच अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान शिव स्वतः होळी साजरी करण्यासाठी काशीला येतात आणि चितेच्या राखेने होळी खेळतात. दरवर्षी काशीचे मुख्य स्मशानभूमी असलेल्या मणिकर्णिका घाटावर लोक बाबा मशननाथ यांना राख, अबीर, गुलाल आणि रंग अर्पण करतात. सर्वत्र डमरू वाजवण्याच्या आवाजात एक भव्य आरती केली जाते आणि लोक डमरू वाजवतात आणि मणिकर्णिका घाटावरील स्मशानभूमीतील जळत्या चितेतील राख एकमेकांना लावतात आणि होळी साजरी करतात. 
ALSO READ: मनकामेश्वर मंदिर आग्रा
तसेच काशी शहराला मोक्षनगरी असेही म्हणतात. विशेषतः होळीच्या वेळी ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जातात, त्यांना निश्चितच मोक्ष मिळतो असे मानले जाते. काशी शहर हे जगातील एकमेव शहर आहे जिथे माणसाचा मृत्यू देखील शुभ मानला जातो आणि अंत्ययात्रा देखील मोठ्या थाटामाटात पार पडते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'टेस्ट' चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित, आर माधवनची व्यक्तिरेखा उघड