सध्याचा काळ पक्षी स्थलांतराचा मानला जातो. जगभरातले विविध प्रजातींचे पक्षी थंडीत भारतात येतात. अन्न आणि निवार्याच्या शोधात येणारे हे पक्षी विविध अभयारण्यांमध्ये स्थिरावतात. भारतात अनेक पक्षी अभयारण्य आहेत. तुम्हालाही पक्षी निरीक्षणाची आवड असेल. येत्या काही महिन्यात या ठिकाणांना भेटी देता येतील.
* हरियाणातल्या गुरूग्रामध्ये सुल्तानपूर पक्षी अभयारण्य आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात इथे जाता येईल. सायबेरिया, युरोप, अफगाणिस्तानातून 100 पेक्षा जास्त प्रजातींचे स्थलांतरित पक्षी इथे येत असतात. सायबेरियन बगळे, फ्लेमिंगो, आशियाई कोएल, येलो वॅगटेल,रोझी पेलीकॅनसारखे पक्षी इथे पाहायला मिळतील.
* राजस्थानातल्या भरतपूर अभयारण्यात मध्य आशियातून येणारे पक्षी पाहायला मिळतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात इथे जाता येईल.
* ओरिसातल्या पुरीमध्ये असलेल्या चिल्का तलाव पक्षी अभयारण्यात ऑक्टोबर ते मार्चदरम्यान जाता येईल. या ठिकाणी फ्लेमिंगोचे दर्शन घडते.
* गुजरातमध्ये नल सरोवर पक्षी अभयारण्यातनोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात जाता येईल. या ठिकाणी 200 प्रजातींचे पक्षी दाखल होतात.
* कर्नाटकातल्या रंगनाथिटू पक्षी अभयारण्यात जानेवारी ते सप्टेंबर या काळात जाता येईल. हे पक्षी अभयारण्य कावेरी नदीच्या किनारी वसले आहे. या ठिकाणी जवळपास 40 हजार स्थलांतरित पक्षी येतात. डिसेंबरच्या मध्यानंतर इथे पक्षी येऊ लागतात.
* केरळमधल्या थट्टेकड पक्षी अभयारण्यात 40 प्रजातींचे पक्षी येतात. या ठिकाणी हिमालय तसेच इतर देशांमधले पक्षी येतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात इथे जाता येईल.