मेघालय हे भारताचं उत्तर -पूर्व राज्य आहे. मेघालयात पाहण्यासारखी बरीच प्रेक्षणीय ठिकाण आहेत. मेघालय हे ढग, पाऊस झरे यांचे स्थळ आहे. मेघालायची राजधानी शिलॉंग आहे. या ठिकाणी धबधब्यांचे साम्राज्य आहे. इथले सर्वात मोठे आणि सुंदर धबधबे नोहकालीकाई आणि लॉंगशीआंग आहे.
1 नोहकालीकाई धबधबा -हा धबधबा ईशान्य भारतातील मेघालय राज्यातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात आहे. हा धबधबा सुमारे 340 मीटर उंच आहे. या ठिकाणी 12 महिने पाऊस पडतो.कारण हा चेरापुंजी येथे आहे. येथे भारतात सर्वाधिक पावसाची नोंद केली जाते. त्यामुळे येथील वातावरण आल्हादायक असते. इथे सतत पाऊस असल्यामुळे धबधबा नेहमी वाहत असतो.
2 लॉंगशीआंग धबधबा - इथे सुमारे 337 मीटर उंच लॉंगशीआंग धबधबा देखील आहे. हा धबधबा उंच टेकड्या आणि जंगल वाटांमधून खाली पडतो. या शिवाय पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात नोहसंगीतिग धबधबा आहे. ते सुमारे 315 मीटर उंचीवर आहे. या धबधब्याला सेव्हन सिस्टर वॉटर फॉल किंवा मसमाई फॉल असे ही म्हणतात. कारण हा धबधबा सात भागामध्ये विभागलेला आहे. हे मसमाई गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे. इथे आणखी एक धबधबा काईनरेम धबधबा हा मेघालयातील चेरापुंजी येथे पूर्व खासी टेकडीवर आहे. हा धबधबा सुमारे 305 मीटर उंचीवर आहे. चेरापुंजी पासून 12 किमी अंतरावर थंगखारंग उद्यान देखील आहे. येथे कायनारायण धबधबा देखील आहे.