India Tourism : नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. प्रत्येकाने नवीन वर्षासाठी काही योजना आखल्या असतात. तसेच प्रत्येकाला सकारात्मकता, सौभाग्य आणि नवीन उर्जेने भरलेले नवीन वर्ष हवे असते. तुम्हाला देखील तुमच्या जोडीदारासोबत शांत वेळ घालवायचा असेल व तुम्ही सौंदर्याने भरलेले, शांत आणि रमणीय ठिकाण शोधत असला तर आज आपण भारतातील असे काही सुंदर ठिकाणे पाहणार आहोत जी तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करू शकतात. ज्यामुळे तुमचे नाते आणखीनच घट्ट होईल. चला तर जाणून घेऊया एक्सप्लोर करावी अशी ठिकाणे.
महाबळेश्वर, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील हे हिल स्टेशन त्याच्या स्ट्रॉबेरी फार्म आणि सुंदर दऱ्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. नवीन वर्षात या ठिकाणी नक्की भेट द्या. जोडीदारासोबत स्ट्रॉबेरी फार्मला भेट द्यायला आणि किंग्ज पॉइंटवरून सूर्यास्त पाहायला विसरू नका.
शिलाँग, मेघालय
"पूर्वेचा स्कॉटलंड" म्हणून ओळखले जाणारे, शिलाँगचे हिरवेगार पर्वत आणि धबधबे पर्यटकांना मोहित करतात. त्याचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. तुम्ही जोडीदारासोबत केव्हरी फॉल्स, अॅम्ब्रोसिया लेक आणि लेडी हेडिंग सारख्या ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.
गोवा
भारतातील सर्वात लहान राज्य असूनही, गोवा खरोखरच एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. त्याचे सौंदर्य अनेकदा उत्तर गोवा आणि दक्षिण गोवामध्ये विभागले गेले आहे. येथे तुम्ही जोडीदारासोबत समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेऊ शकता. गोव्याचा प्रसिद्ध बागा बीच त्याच्या नाईटलाइफ, वॉटर स्पोर्ट्स (पॅरासेलिंग, जेट स्कीइंग) आणि उत्कृष्ट सीफूडसाठी प्रसिद्ध आहे.
मनाली
मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक सुंदर हिल स्टेशन आहे, जे त्याच्या बर्फाच्छादित पर्वत आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. तुम्ही जोडीदारासोबत साहसी असाल किंवा शांतता शोधत असाल, मनालीमध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहे. तुम्ही येथे साहसी क्रियाकलापांमध्ये देखील सहभागी होऊ शकता.
Edited By- Dhanashri Naik