Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बंदरपूंछ' या ठिकाणी हनुमानाने लंका दहन केल्यावर शेपटी विझवली

'बंदरपूंछ' या ठिकाणी हनुमानाने लंका दहन केल्यावर शेपटी विझवली
, मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (22:17 IST)
उत्तराखंड राज्य, ज्याला देवभूमी म्हटले जाते, ते नैसर्गिक सौंदर्य, सुंदर दृश्ये आणि इतिहासासाठी जगभर प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमध्ये अनेक प्राचीन पर्वत, गंगा-यमुनेसह अनेक सुंदर ठिकाणे आहेत. अशी आख्यायिका आहे  की या शिखरांवर अनेक गूढ आणि देवी-देवतांच्या कथा दडलेल्या आहेत. असेच एक रहस्यमय शिखर उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात स्थित बंदरपूंछ ग्लेशियरमध्ये आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया-
 
बंदरपूंछचा शाब्दिक अर्थ "माकडाची शेपटी" असा आहे. हे उत्तराखंडच्या पश्चिम गढवाल प्रदेशात स्थित एक ग्लेशियर आहे. हा ग्लेशियर समुद्रसपाटीपासून 6316 मीटर उंचीवर आहे. त्याचा संबंध रामायण काळापासून असल्याचे मानले जाते. पौराणिक कथेनुसार जेव्हा लंकापती रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावली तेव्हा हनुमानाने संपूर्ण लंकेला आग लावली. यानंतर हनुमानजींनी या शिखरावरच आपल्या शेपटीची आग विझवली. त्यामुळे याला बंदरपूंछ असे नाव पडले. एवढेच नाही तर यमुना नदीचे उगमस्थान असलेल्या यमुनोत्री हिमनदीलाही बंदरपूंछ शिखराचा एक भाग मानले जाते.  
 
माकडाच्या शेपटीत तीन शिखरे आहेत - बंदरपूंछ 1, बंदरपूंछ 2 आणि काली शिखर आहे. यमुना नदीचे उगमस्थान बंदरपूंछ सर्कल ग्लेशियरच्या पश्चिम टोकाला आहे. बंदरपूंछ ग्लेशियर हिमालयाच्या गंगोत्री रांगेत येते. या ग्लेशियरवर सर्वप्रथम चढण मेजर जनरल हॅरोल्ड विल्यम्स यांनी 1950 साली केले होते. या संघात महान गिर्यारोहक तेनझिंग नोर्गे, सार्जंट रॉय ग्रीनवुड, शेर्पा किन चोक त्सेरिंग यांचा समावेश होता.
 
बंदरपूंछ ग्लेशियरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ -
बंदरपूंछ ग्लेशियरला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे मार्च ते ऑक्टोबरचा आहे. जर येथे ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर मे आणि जून हे महिने येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहेत. 
 
 ट्रेकिंगचा आनंद ही घेऊ शकता 
पर्यटकही येथे ट्रेकिंगचा आनंद घेतात. या काळात ट्रेकिंगच्या वाटेवर वसंत ऋतूची अनेक फुले पाहायला मिळतात. याशिवाय अनेक दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजातीही बघायला मिळतात. 
 
जायचे कसे -
 बंदरपूंछ ग्लेशियरवर जाण्यासाठी डेहराडूनला जावे लागेल. तिथून उत्तरकाशीला गाडी घेऊन ग्लेशियरला जाता येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेते प्रशांत दामलेंची फेसबूक पोस्ट हा कोरोना आणि ही बंधनं कधी संपतायत असं झालंय