Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या
, बुधवार, 23 जून 2021 (20:14 IST)
भारताचे राज्य जम्मू, काश्मीर, लद्दाख, उत्तराखंड ,सियाचीन, हिमालय, सिक्कीम, आसाम,अरुणाचल पर्यंत हिमालय पसरला आहे.हे सर्व राज्ये हिमालयाच्या कुशीत आहे.या शिवाय,उत्तरी पाकिस्तान,उत्तरी अफगाणिस्तान, तिबेट,नेपाळ आणि भूतान हे देश हिमालयाचा भाग आहेत.म्हणजे हिंदुकुश काराकोरम पासून ते अरुणाचल पर्यंत हिमालय आहे.हिमालय पर्वतशृंखलेत शेकडो पर्वत आणि नयनरम्य खोऱ्या आणि घनदाट जंगल आहे.चला हिमालयाच्या या यात्रे बद्दल 10 खास गोष्टी जाणून घेऊ या. 
 

1 भारतीय हिमालयाचे 4 भाग -जम्मू-काश्मीर-लडाख हिमालय (सिंधू नदी ते सतलज नदीच्या मध्यचा भाग), गढवाल-कुमाऊं हिमालय (सतलज ते काली नदी (शरयू) चा मध्य भाग ),नेपाळ,हिमालय (शरयू नदी ते तीस्ता नदीचा मध्य भाग),आसाम-अरुणाचल हिमालय (तीस्ता नदीपासून ब्रह्मपुत्र नदीच्या काठा पर्यंतचा भाग).आहे.
 
 

2 हिमालयाची शिखरे-हिमालयातील काही प्रमुख शिखरांमध्ये सरकत महत्त्वपूर्ण आहे सागरमाथा,हिमालय एव्हरेस्ट (गौरीशंकर), कैलास,अन्नपूर्णा,गणेय, लाँगतांग, मानसलू,रोलवालिंग,जुगल,गौरीशंकर,केटू(K2),कुंभू,धौलागिरी,नंदादेवी,आणि कांचनजंघा आहे
 
 
3 हिमालयातील तीर्थस्थळे- हिमालयात बद्रीनाथ,केदारनाथ,कैलाश मानसरोवर,यमुनोत्री,गंगोत्री,पंच कैलाश,पंच बद्री,पशुपतिनाथ,जनकपूर,देवात्मा हिमालय,अमरनाथ,कौसरनाग,वैष्णोदेवी,गोमुख,देवप्रयाग,ऋषिकेश,हरिद्वार, नंदादेवी, चौखम्बा,संतोपथ,नीलकंठ,सुमेरु पर्वत,कुनाली त्रिशूल,भारतखूण्टा,कामेत,द्रोणागिरी,पंचप्रयाग,पंचकेदार, तुंगनाथ,मध्महेश्वर,गोपेश्वर,हेमकुण्ड साहिब इत्यादी शेकडो तीर्थस्थळेआहेत.या केदारखंडातअलंकापुरी,तपोवन, गोमुख,ब्रह्मपुरी, नंदनवन,गन्धमादन,वासुकीताल,वसुधारा इत्यादी दर्शनीय तीर्थस्थळे आहेत.
 
 

4 पर्यटन स्थळे हिल स्टेशन- श्रीनगर,लडाख,उत्तरकाशी,ऊखीमठ,त्रिजुगीनाराण,जोशीमठ,टिहरी,पौड़ी,फुलांची घाटी,(व्हॅली ऑफ फ्लॉवर), रुद्रप्रयाग,अलमोडा,रानीखेत,नैनिताल,मानुस्यारी,वागेस्यारी,वाघेश्वर,शिमला,मनाली, जागेश्वर,धारचुला,पिथोरागड,लोहाघाट,चंपावत,डेहराडून,मसुरी,ऋषिकेश,हरिद्वार इत्यादी स्थळे आहेत. 
 
 

5 हिमालयातील नद्या- हिमालयातून निघणाऱ्या हजारो नद्यांपैकी काही गंगा,सरस्वती,यमुना,सिंधू,ब्रह्मपुत्रा,आणि यांगतेज वर धरण बांधल्या मुळे हिमालयाच्या स्वरूपात बिगाड झाला आहे.या नद्या अशा आहेत ज्यांच्या बळावर इतर दुसऱ्या नद्या जिवंत आहे.
 
 

6 सिद्धाश्रम मठ,आणि गुहांचे रहस्य-हिमालयात अनेक जैन, बौद्ध व हिंदू संतांच्या प्राचीन मठ आणि गुहा आहेत. ज्ञानगंज मठ,जोशीमठ,हेमिस मठ,लामायुरू मठ, शांती स्तूप,एंचेय मठ,दुब्दी मठ,मंदिर पेमायांगत्से, इत्यादी. केदारनाथ,बद्रीनाथ,अमरनाथ सारख्या ठिकाणी हजारो अशा चमत्कारिक गुहा आढळतात.ज्या ठिकाणी सामान्य माणूस जाऊ शकत नाही. बद्रिकाश्रमात सरस्वतीच्या काठावर व्यास आणि जैमीन यांचा आश्रम होता. येथे महर्षि वेद व्यास यांनी 18 पुराणांची रचना केली. कश्यप आणि अरुंधतीचे हिमदाश्रय,जगदग्नि यांचे उत्तरकाशी जवळ, गर्ग ऋषींचे द्रोणागिरीत,मनूचे बद्रीनाथ जवळ,अगस्त्य आणि गौतम ऋषींचे मंदाकिनीच्या काठी.केदारनाथच्या मार्गावर अगस्त्य मुनींचे,यमुनोत्री जवळ पाराशर मुनींचे,उत्तरकाशीत परशुरामाचे,कैदारकंठात भृगुंचे,अत्री आणि अनुसूयेचे गोपेश्वर येथे विद्यापीठ होते.त्याच प्रमाणे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग, पहलगाम, अमरनाथ,शिवखेडी गुहा,सुरींसार, आणि मानसर तलाव,श्रीनगर,कौसरनाग,इत्यादी असे स्थळं आहे,जेथे मठ आणि आश्रम असायचे.      
 

7 भारतात हिमालयातील राज्यांमध्ये प्रवास करणे जीवनातील सर्वात मोठा रोमांच असू शकतो.जर आपण रहस्य आणि रोमांच आणि धाडसाला सामोरी जाण्याची इच्छा बाळगता तर आपण लडाख,सिक्कीम,किंवा अरुणाचलच्या प्रवासाला जावे. आपण कुठे जाऊन आलात हे आयुष्यात कधी ही विसरणार नाही. 
भारतातील ही पूर्वोत्तर राज्ये आपल्यात नैसर्गिक सौंदर्याचा अभिमान बाळगतात. इथले उंच पर्वत बघण्यासारखे आहेत.जर आपल्याला पर्वतांचे सौंदर्य बघायचे आहे  तर आपण निश्चितपणे पूर्वोत्तर कडील राज्यांत भेट द्या.अरुणाचलच्या उंच शिखरावरुन खाली पडणारे धबधबे हे जगातील सर्वात सुंदर धबधबे आहेत. विशेषत: गोरीचन आणि कांगटो ची शिखर बघून एक आश्चर्यकारक अनुभव व अनुभूती मिळते.वळणदार सर्पासारखे डोंगर कोमेंग मध्ये धाडसी पर्यटकांसाठी एक आदर्श स्थळ आहे.सिंधू नदी लडाख मधून निघून पाकिस्तानच्या कराचीत वाहते.

प्राचीन काळी लडाख हे अनेक महत्त्वपूर्ण व्यापार मार्गांचे मुख्य केंद्र होते. लडाख हा एक उंच पाठार आहे.त्यातील बहुतेक भाग 3,500 मीटर (9,800फुटा)पेक्षा उंचीवर आहे.हे हिमालय आणि काराकोरम पर्वत शृंखलेत आणि सिंधू नदीच्या वर खोऱ्यात पसरले आहे.अंदाजे 33,5544 चौरस मैल,वर पसरलेल्या लडाखमध्ये फारच कमी वस्तीची जागा आहे.इथे प्रत्येक ठिकाणी उंच आणि मोठे खडकाचे डोंगर आणि मैदान आहे.इथे सर्व धर्मांच्या लोकांची एकूण जनसंख्या अंदाजे 2,36,539 आहे. 
 

8 हिमालयात फिरायचे आहे तर विशेष करून उत्तराखंड,हिमाचल,जम्मू - काश्मीर आणि लडाख आधी फिरून घ्या.नंतर केलास मानसरोवर फिरायला जावे.अरुणाचल चा प्रवास करताना मधून हिमालयाचे क्षेत्रांना बघत जावे.
प्रवासाची सुरुवात हिंदुकुश पासून केली जाते.परंतु ते क्षेत्र अफगाण आणि पाकिस्तानाचे आहे.
 


9 वरील राज्यांमध्ये बहुतेक तीर्थक्षेत्र,पर्यटन स्थळे,हिल स्टेशन आणि रोमांचकारी क्षेत्र आहे.या राज्यात श्रीनगर, शिमला,मनाली,चारधाम,अमरनाथ,शक्तीपीठ,आणि इतर बऱ्याच स्थळांना बघू शकता.
 

10 हिमालयातील जंगलांमध्ये उत्तराखंडचा राजाजी राष्ट्रीय उद्यान,पौड़ी जिल्ह्यात बरीच जंगल आहे,नंदा देवी राष्ट्रीय अभयारण्य (उत्तराखंड), फुलांची घाटी किंवा व्हॅली ऑफ फ्लावर्स (उत्तराखंड),डाचिगम राष्ट्रीय उद्यान (जम्मू-कश्मीर), किश्तवाड़ राष्ट्रीय उद्यान (जम्मू-कश्मीर),खुई वन्य जीवन अभयारण्य (अरुणाचल), कीबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान (मणिपुर), नोंगखाइलेम अभयारण्य (मेघालय), ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान (हिमाचल) इत्यादी अनेक जंगल आहेत.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नियम म्हणजे नियम