उन्हाळ्यामध्ये जेव्हा संपूर्ण भारतभर रणरणतं ऊन असतं, तेव्हा हिमाचल प्रदेशात मात्र हवा अतिशय सुखद आणि आल्हाददायक असते. म्हणूनच खासकरून मे महिन्यात हिमाचलला जाणाऱ्यांची संख्या वाढते. अर्थात हिमाचल प्रदेशाचा आनंद लुटायचा असेल तर, शिमला, कुलू व मनाली या ठिकाणांबरोबरच आडवाटेवरच्या ठिकाणांनाही भेट द्यायला हवी.
शिमला
पर्यटकांमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असणारं हे शहर ब्रिटीशांच्या काळात भारताची उन्हाळ्याची राजधानी होतं. शिमला या नावाचा उगम बहुधा शामला या देवीच्या नावावरून झाला असावा असं मानलं जातं. शिमल्याचा बराचसा भाग हॉटेल्समुळे गजबजलेला असला तरी प्रमुख मॉल व इतर भागांमधील १९ व्या शतकातील खास ब्रिटिशांच्या स्टाईलमधील इमारती आपलं लक्ष वेधून घेतात. संपूर्ण पर्वत उतारावर वसलेल्या या शहराचं सायंकाळचं दृश्य नजर खिळवून ठेवतं. मॉलरोडवर पर्यटकांची गर्दी उसळलेली आपल्याला पाहायला मिळेल. शिमल्यापासून जवळच तट्टा पानी या ठिकाणी काही गरम पाण्याचे झरे असलेलं ठिकाण आपल्याला सतलज नदीच्या काठावर पाहायला मिळेल.
शिमल्याच्या आसपासची ठिकाणं पुढील पानावर पाहा
कालीबारी
|
|
येथे कालीमातेचं मंदिर असून ही देवी श्यामला या नावाने ओळखली जाते.
पुढे पाहा जाखू हिल
जाखू हिल
|
|
शहरातून सहजपणे नजरेस पडणाऱ्या या टेकडीवर हनुमानाचं मंदिर आहे. इथे गेल्यावर माकडांपासून मात्र सावध राहायला हवं.
पुढील पानावर पाहा समर हिल
समर हिल
|
|
एकेकाळचा व्हाईसरॉयचा राजवाडा. आता मात्र येथे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज् आहे.
पुढील पानावर पाहा प्रॉस्पेक्ट हिल
प्रॉस्पेक्ट हिल
|
|
स्कॅण्डल पॉईंटपासून सुमारे पाच कि.मी.वर असलेल्या या ठिकाणावरून पौर्णिमेला एकाच वेळी सूर्यास्त व चंद्रोदय पाहता येतो.
पुढील पानावर पाहा चैल
चैल
|
|
हे नुकतंच पर्यटनाच्या नकाशावर आले असून येथे जगातलं सर्वाधिक उंचीवर असलेलं क्रिकेटचं मैदान आहे. त्याचबरोबर कुफ्री, फागु ही ठिकाणंही पाहण्यासारखी आहेत.
पुढील पानावर पाहा नारकण्डा
नारकण्डा
|
|
शिमल्यापासून ६४ किमीवर वसलेले नारकण्डा हे खासकरून स्किईंगसाठी प्रसिद्ध आहे. सूचीपर्णी वृक्षांच्या अरण्याच्या कुशीत वसलेल्या या गावात पर्यटक उन्हाळ्यात नाही तर हिवाळ्यात गर्दी करतात. इथल्या डोंगरउतारांवर हिवाळ्यामध्ये ६०० पेक्षा जास्त मीटर लांब हिमाचे उतार तयार होतात. खासकरून हौशी आणि धाडसी पर्यटकांसाठी हा स्पॉट मानला जातो.
पुढील पानावर पाहा कुलू
कुलू
|
|
शिमला, कुलू, मनाली या जगप्रसिद्ध त्रिकूटांपैकी एक म्हणजे कुलू. कुलू म्हणजे देवांचं निवासस्थान. इथल्या प्रत्येक छोटय़ा मोठय़ा खेडय़ात देवी-देवतांची मंदिरं पाहिल्यावर याला देवांचं निवासस्थान का म्हणतात याची कल्पना येईल. हिवाळ्यात हिमवृष्टीमुळे, पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या लोंढय़ामुळे व उन्हाळ्यात वितळून येणाऱ्या पुरांमुळे सर्वसामान्यपणे जगणं म्हणजे इथलं कर्मकठीण काम.. म्हणूनच गावोगावी एक पावसाची देवता, एक थंडीची देवता, वाऱ्याची देवता, सूर्यप्रकाशाची देवता अशा अनेक देवदेवता अस्तित्वात आल्या.
पुढील पानावर पाहा मालना
मालना
|
|
ट्रेकिंगची आवड आहे अशा लोकांसाठी हे ठिकाण आहे. ८६४० फुटावर असणारे हे ठिकाण म्हणजे स्वप्नभूमीच आहे.
पुढील पानावर पाहा मनाली
मनाली
|
|
कुलूपासून ४० किमी अंतरावर मनाली आहे. क्विन ऑफ हिल म्हणून मनालीला संबोधलं जातं. मानव व मानवतेचा जनक मानला जाणाऱ्या मनूचं हे गावं. जुन्या मनालीला मनूचं मंदिरही आहे. मनालीला पाहण्यासाठी वसिष्ठ गरम पाण्याची कुंडं, जोगिनी प्रपात, हिडिंबा मंदिर ही ठिकाणं आहेत.
पुढील पानावर पाहा रोहतांग पास
रोहतांग पास
|
|
मनालीपासून ५२ कि.मी. अंतरावर रोहतांग खिंड आहे. समुद्रसपाटीपासून ३९७८ मीटर म्हणजेच १३ हजार फूट उंचीवरची ही खिंड म्हणजे हिमाचल प्रदेशाच्या एका अपरिचित भागाचं प्रवेशद्वार आहे.
पारंपरिक पर्यटनाच्या चौकटीतून बाहेर डोकावलं तर राफ्टिंग, पॅरासेलिंग, बलून सफारी, स्किईंग व रॉक क्लायम्बिंग याकरता हिमाचलपेक्षा दुसरी सुंदर जागा नाही. मात्र या सर्वासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक हवा. फार कुठे न फिरता फक्त निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर हिमाचल प्रदेशपेक्षा इतर कुठलाही पर्याय नाही. आकाशाला साद घालणारी हिमशिखरं, खळाळून वाहणाऱ्या नद्या आणि हिमाचली चेहरे तुमची वाट पाहात आहेत.