कानपूरपासून केवळ 22 किमीवर असलेले, गंगाकिनारी वसलेले छोटेसे गांव बिठूर हे भारताच्या इतिहासातील अनेक महत्तवपूर्ण घटनाचे साक्षीदार असलेले छ्टेसे गांव आहे. अगदी टुमदार अशा या गावचे उल्लेख भारताच्या प्राचीन काळापासून येतात. अनेक एतिहासिक घटना येथे घड्ल्या आहेत असे सांगितले जाते.
या एवढयाशा गावांने काय काय अनुभवले याची यादी वाचली तर थक्क व्हायला होते. रामाने सितेचा त्याग केला तो इथेच. वाल्हाचा वाल्मिकी झाला तो याच गावात. इथेच वालिमकीनी तपश्चर्या करुन रामायणाची रचना केली. 1857च्या बंडाचे प्रमुख केन्द्र हेच होते. इतकेच नव्हे तर ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना येथेच केली आणी त्यानंतर अश्वमेध यज्ञही केला. याची खूण म्हणून ब्रह्मदेवाने घोड्याचा नालेची स्थापना केली असेही सांगितले जाते. ब्रिटीशानी भारताचा ताबा घेतल्यानंतर शेवट्चा पेशवा दुसरा बाजीराव येथेच राहिला आणि पेशवा आल्यापासून या गावाने नवा अध्याय लिहिला.
1857च्या बंडातले प्रमुख मोहरे नानाराव, तात्या टोपे येथेलेच. आजही टोपे परिवाराचे सदस्य येथे राहतात. ब्रिटिशांची प्राणपणाने लढणारी आणी मेरी झाँसी नही दूंगी म्हणनारी राणी लक्ष्मीबाई, हीचे बालपन याच गावात गेले. 52 घाटाची नगरी म्हणून ओळखल्या जाणार्या या गावात आजमितीस केवळ 29 घाट शिल्लक आहेत. सीतामाईने पुत्र लव आणि कुश यांना ज्या आश्रमात जन्म दिला तो वाल्मिकी ऋषिचा आश्रम थोडा उंचावर असलेल्या टेकडीवर आहे. अतिशय पवित्र असा ब्रह्मापवर्त घाट आणि लाल दगडांत बान्धलेला पाथरघाट ही येथेली आणखी कांही वैशिष्ठ्ये.
इतक्यावरच या गावाची महिमा थांबत नाही. पाथर घाटावर असलेले भव्य शिवमंदिर आवर्जून पाहावे असेच या मंदिरातील शिवलिंग कसोटीच्या दगडापासून बनविले गेले आहे. कसोटीचा दगड म्हणजे सोन्याच्या कसाची परिक्षा करणारा दगड. ध्रुवटिला येथेही भेट द्यावीच. कारण येथेचे ध्रुवाने घोर तपश्चर्या करुन अढळस्थानाची प्राप्ती करुन घेतली असेही सांगितले जाते.