Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चांदोमामाला अगदी जवळून पाहता येणारी मून व्हॅली

चांदोमामाला अगदी जवळून पाहता येणारी मून व्हॅली
, शनिवार, 16 जून 2018 (12:32 IST)
आपला बालपणीचा सवंगडी चांदोमामा म्हणजे चंद्रावर जाण्याची संधी आपल्याला कधी मिळेल कोणास ठाऊक. पण निदान आपण त्याला अगदी जवळून न्याहाळण्याची संधी नक्की घेऊ शकतो. चिले देशातील अटाकामापासून दक्षिणेकडे 13 किमीवर असणारी वेले डे ला लुना म्हणजे मून व्हॅली त्यासाठी गाठायला हवी. जगभरातून येथे पर्यटक केवळ याच एका कारणासाठी गर्दी करतात. तेथून पौर्णिमेचा चंद्र पाहणे हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. या व्हॅलीमध्ये कोरडे पडलेले एक सरोवर आहे मात्र तेही या दरीच्या सौंदर्यात अधिक भर घालते. या ठिकाणी असलेली विविध रंगांची माती आणि उंच पहाडामागून उगविणारे पूर्ण चंद्रबिंब आपण कोणत्यातरी जादू नगरीत आल्याचा भास होतो. येथील डोंगरांना सॉल्ट माउंटन म्हणतात कारण त्याच्यात क्षाराचे प्रमाण अधिक आहे आणि यामुळेच इथल्या मातीला विविध रंग आले आहेत. लाल, निळी, पिवळी माती हे इथले वैशिष्ट्य. येथून चंदामामाला पाहण्यासाठी 13200 फूट अंतर चढावे लागते. त्यासाठी साधारण दोन तास लागतात आणि एकदा येथे पोहोचले की रात्रीच्या अंधारात उगविणारे विशाल चंद्रबिंब डोळ्यात भरून घेता येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पराक्रमाच्या गाथा सांगणारा 'फर्जंद' ठरतोय महत्त्वाचा