Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Promise Day Special या रोमँटिक बीच वर द्या पार्टनरला प्रेमाचे वचन

goa beach
, मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 (07:30 IST)
India Tourism : दरवर्षी अकरा फेब्रुवारी रोजी प्रॉमिस डे साजरा केला जातो. तसेच हा व्हॅलेंटाईन आठवड्याचा पाचवा दिवस आहे. या दिवशी लोक त्यांच्या जोडीदारांना किंवा मित्रांना विशेष वचने देतात. प्रॉमिस डे दिवशी सर्वजण त्यांचे नाते मजबूत करण्यासाठी वचने देतात. तसेच आज आपण देशातील काही असे रोमँटिक बीच पाहणार आहोत जिथे तुम्ही या दिवशी तुमच्या पार्टनला नक्कीच वचन देऊ शकतात व प्रॉमिस डे साजरा करू शकतात. तर चला जाणून घेऊ या भारतातील काही रोमँटिक बीच, जे तुमच्या प्रेमाच्या वाचनाचे नक्कीच साक्षी बनतील.

 
बागा बीच गोवा-
मोरजिमपासून थोड्या अंतरावर दक्षिणेकडे असलेला बागा बीच एक खास आणि वेगळा अनुभव देतो. हा गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे जो शांत आणि नयनरम्य वातावरणाचा अनुभव करून देतो. येथे तुम्ही तुमच्या जोडीदाराला नक्कीच प्रेमपूर्ण वाचन देऊ शकतात. या रोमँटिक  समुद्रकिनारी नक्कीच तुम्ही तुमचा प्रॉमिस डे साजरा करू शकतात.

लक्षद्वीप-
प्रवाळ खडकांचे अस्पर्शित सौंदर्य आणि प्रेमाची भावना या वातावरणात तुम्ही पार्टनरला नकीच वचन देऊ शकतात. लक्षद्वीप जोडप्याला त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक परिपूर्ण पर्याय बनवते. एक अनोखा आणि खास समुद्रकिनाऱ्यावरील प्रॉमिस डे चा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी लक्षद्वीप बेटे कोरल अ‍ॅटोल आणि स्वच्छ निळ्या पाण्याची एक चित्तथरारक पार्श्वभूमी देतात.

webdunia
पुरी-
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले ओडिशातील पुरीचे सोनेरी समुद्रकिनारे एक नयनरम्य ठिकाण प्रदान करतात. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज आणि सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे मऊ रंग एक जादुई वातावरण निर्माण करतात या नयनरम्य आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही प्रॉमिस डे च्या दिवशी तुमच्या पार्टनरला नक्कीच वचन देऊ शकतात.  

webdunia
 
अंदमान आणि निकोबार-
अंदमान निकोबार येथील हॅवलॉक बेटावरील राधानगर समुद्रकिनारा त्याच्या शुद्ध पांढऱ्या वाळू आणि नीलमणी रंगाच्या पाण्याने एक लोकप्रिय ठिकाण आहे. या बेटांचे दुर्गम स्थान एक जिव्हाळ्याचे वातावरण प्रदान करते.या अल्हादाययक जिव्हाळ्याच्या वातावरणात तुम्ही तुमच्या पार्टनरला नक्कीच वचन देऊन प्रॉमिस डे साजरा करू शकतात.   

webdunia
अलिबाग बीच-
अलिबाग तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरला या ठिकाणी नक्कीच घेऊन जाऊ शकतात. या ठिकाणाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथून कुलाबा किल्ल्याचे सुंदर दृश्य दिसते. तसेच येथे सूर्यास्ताचे रोमँटिक दृश्य देखील अनुभवता येते. अलिबाग या सुंदर आणि आल्हादायक रोमँटिक वातावरणात तुम्ही नक्कीच तुमच्या पार्टनरला वचन देऊन प्रॉमिस डे साजरा करू शकतात.

जुहू बीच
मुंबईतील या सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्याला भेट देऊ तुम्ही नक्कीच प्रॉमिस डे साजरा करू शकतात. जुहू बीच हे त्याच्या सौंदर्यामुळे सर्वांना आकर्षित करते. हे त्याच्या शांत वातावरणासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथील शांत आणि रमणीय वातावरणात पार्टनला प्रेमाचे वचन देऊन हा दिवस साजरा करू शकतात. भारतातील हे समुद्रकिनारे त्यांच्या खास वातावरणांसाठी प्रसिद्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला