Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Romantic Honeymoon Destination: रोमँटिक हनिमूनसाठी या ठिकाणांना भेट द्या, एप्रिलमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

Romantic Honeymoon Destination: रोमँटिक हनिमूनसाठी या ठिकाणांना भेट द्या, एप्रिलमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे
, शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (23:08 IST)
लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला त्यांचा हनीमून खूप खास बनवायचा असतो. अशा परिस्थितीत, तो सर्वोत्तम आणि रोमँटिक ठिकाणे शोधतो. कोरोनाचा धोका पुन्हा एकदा डोकावू लागला आहे, अशा परिस्थितीत आम्ही भारतातील काही रोमँटिक हनीमून डेस्टिनेशन्सबद्दल सांगत आहोत. आपले नुकतेच लग्न झाले असेल किंवा लवकरच होणार असेल तर या ठिकाणी जाण्याचा विचार करू शकता. एप्रिल महिन्यात हनिमूनसाठी ही ठिकाणे उत्तम आहेत. 
 
1 दार्जिलिंग- जोडीदारासोबत उत्तम हवामानाचा आनंद घेण्यासाठी दार्जिलिंग हे सर्वोत्तम ठिकाण आहे. एप्रिल महिन्यात थंडी संपते आणि मग इथून कंचनजंगाच्या हिमशिखराचे सुंदर दृश्य दिसू लागते. आपण जोडीदारासोबत रोपवेचा आनंद घ्या, कारण इथून आपल्याला हिमशिखरांचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. यासह, येथील प्रसिद्ध टॉय ट्रेनचा नक्कीच आनंद घ्या. येथे आपण हनिमूनसाठी एक आठवडा आरामात घालवू शकता.  
 
2 शिलाँग- प्रत्येकाचे मन जिंकणारे हे सुंदर ठिकाण एप्रिलमधील हनीमूनसाठी सर्वोत्तम आहे. शिलाँगला भेट देण्यासाठी हा महिना चांगला आहे, कारण यावेळी भरपूर हिरवळ असते. ज्याचा आपण जोडीदारासोबत आनंद घेऊ शकता. या महिन्यात हवामान चांगले असते. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्यात हनिमूनसाठी हे ठिकाण उत्तम आहे. येथे हनिमूनसाठी पाच दिवस पुरेसे आहेत.
 
3 उटी- उटी हे एक छोटेसे डोंगरी शहर आहे, जे एप्रिल महिन्यात हनिमूनसाठी योग्य आहे. आपल्याला आपला हनिमून शांततेच्या आणि निवांत क्षणांमध्ये घालवायचा असेल, तर आपण उटीला भेट देण्यासाठी जाऊ शकता. आपण आपल्या जोडीदारासोबत काही छान ठिकाणे देखील एक्सप्लोर करू शकता. एप्रिल आणि मे महिन्यात उटीचे हवामान खूपच आल्हाददायक असते. या ठिकाणी भेट देण्यासाठी दोन दिवस पुरेसे आहेत. 
 
4 काश्मीर - काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. हेच कारण आहे की बऱ्याच  काळापासून हे ठिकाण जोडप्यांचे आवडते हनिमून डेस्टिनेशन आहे.या महिन्यात संपूर्ण ठिकाण खूप आनंददायी बनते. या महिन्यात भेट दिल्याने आपल्याला आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप फेस्टिवलचा अनुभव मिळेल. इथे भटकंती साठी एक आठवडा भरपूर आहे. 
 
5 लक्षद्वीप- जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवण्यासाठी लक्षद्वीप हे उत्तम ठिकाण आहे. स्वच्छ आकाश, मोहक सरोवर, निळे पाणी, सूर्यास्त आणि सुंदर दृश्ये आपला हनिमूनचा प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवतील. जरी हे ठिकाण उन्हाळ्यात थोडे गरम असले तरी बजेटमध्ये हनीमूनसाठी हे सर्वोत्तम आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विशाखा सुभेदारची हास्यजत्रेतून 'एक्झिट' कारण...