Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निसर्गरम्य हिल स्टेशन चंबा

निसर्गरम्य हिल स्टेशन चंबा
, शनिवार, 26 जून 2021 (17:43 IST)
हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या ,लांब, सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल,सातपुऱ्याचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर.काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत.या वेळी आपण भारतातील शीर्षच्या हिल स्टेशन चंबाची माहिती घेऊ या.
 
1 जर आपण हिमाचलमधील सर्वात मखमली आणि हिरवेगार असलेल्या शहरात फिरायला गेला तर आपल्याला तिथून येण्याचा मोह आवरणार नाही.हे ठिकाण नयनरम्य आणि पांढऱ्या दऱ्यांच्या मध्यभागी आहे.
 
2 उत्तराखंडच्या मसूरी पासून अवघ्या 13 तासाच्या अंतरावर चंबा आहे.हे टिहरी, मसूरी उत्तरकाशी जाणाऱ्या रस्त्यांच्या मध्यभागी आहे.पंजाबच्या अमृतसर शहरा पासून आपण इथे ट्रेन ने जाऊ शकता.हे ठिकाण अमृतसर पासून 250 किमीच्या अंतरावर आहे.
 
3 चंबा च्या वळणदार रस्ते आणि उंच उंच झाडाने भरलेल्या खोऱ्या,त्यात दडलेले सुंदर लहान लहान घरे आपल्याला आकर्षित करतात.
 
4 इथले हवामान वर्षभर सुखद असते आणि वातावरण असं की एकदा तिथे भेट दिल्यावर परत येण्याची इच्छाच होणार नाही. 
 
5 चंबा शहर आणि गाव बघण्यासारखे आहे. खुंडी, माराल,डल,गंडासरू, महाकाली डल,पदरी जोत,झुमार घाटी,तलेरू,चमेरा झील, खाजियार,चंबा चौगान,भांदल घाटी, भरमौर आणि पंजपूला सारखे नैसर्गिक स्थळे आहेत तर  दुसऱ्या बाजूने चौरासी मंदिर, हरीराय मंदिर, चामुंडा मंदिर, चंपावती मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर इत्यादी अनेक मंदिरे आहेत.
 
6 हे शहर बऱ्याच लहान लहान खेड्यांपासून बनलेले आहे.चंबाला भेट देऊन आपण ग्रामीण जीवनाचा आनंदही घेऊ शकता.
 
7 इतर शहरांच्या तुलनेत येथे राहण्याची किंमत खूपच कमी आहे, ज्यामुळे पर्यटकांना येथे रहायला आवडते.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डोळे अजूनही त्या महान व्यक्तीला शोधत आहेत