Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मार्चमध्ये कुटुंबासह भेट देण्यासाठी काही सर्वोत्तम ठिकाणे

मार्चमध्ये कुटुंबासह भेट देण्यासाठी काही  सर्वोत्तम ठिकाणे
, बुधवार, 2 मार्च 2022 (23:01 IST)
प्रत्येकाला प्रवास करण्याचा छंद असतो. काही लोकांना एकट्याने प्रवास करणे आवडते, तर काही लोक मित्र आणि कुटुंबासह प्रवास करण्याचा विचार करतात.काही लोक रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून चार दिवस शांततेत घालवणं पसंत करतात. हे काही ठिकाण असे आहेत जिथे आपल्याला शांतता अनुभवता येईल. आपण आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसह या ठिकाणी भेट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 मथुरा -उत्तर प्रदेश हे श्रीकृष्णाचे शहर आहे, इथला होळीचा सण संपूर्ण देशात सर्वात प्रसिद्ध आहे. मथुरेतील द्वारकाधीश मंदिर आणि वृंदावनातील बांके बिहारी मंदिरात होळीचा उत्सव पाहण्यासारखा आहे. लाठीमार होळीची परंपरा आहे, ती पाहण्यासारखी आहे. होळीनंतर इथे फुलांची होळी होते. अशा स्थितीत कृष्ण भक्तीत तल्लीन व्हायचे असेल तर होळीच्या सुमारास मथुरेला जाण्याचा बेत आखावा.
 
2 हंपी- कर्नाटकात होळी दोन दिवस साजरी केली जाते. या दरम्यान बरेच लोक हंपीला भेट देण्यासाठी येतात आणि रंगांची होळी साजरी करतात. ढोलताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात. 
 
3 आसाम- आसामची होळी एका खास पद्धतीने साजरी केली जाते. त्याला डोल जत्रा म्हणतात. दोन दिवसीय उत्सवाच्या पहिल्या दिवशी लोक मातीची झोपडी जाळून होलिका दहन करतात.
 
4 ऋषिकेश- शांतता आणि निवांत क्षण घालवण्यासाठी ऋषिकेश हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्‍हाला मेडिटेशन आणि योगा यांच्‍या गोष्‍टींमध्‍ये रुची असेल तर आपल्याला  या ठिकाणी खूप मजा येईल. तसेच, येथे अनेक कॅफे आहेत, जिथे आपण मित्रांसह आनंद घेऊ शकता. 
 
5 तवांग-अरुणाचल प्रदेशातील तवांग हे मार्चमध्ये फिरण्यासाठी चांगले ठिकाण आहे. मार्च महिन्यातील सुंदर हवामान आपल्याला मंत्रमुग्ध करेल. बौद्धांसाठीही हे पवित्र स्थान आहे. सिंगल्ससाठी जाण्यासाठी आणि कुटुंब किंवा मित्रांसह भेट देण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे. 
 
6 शिलाँग- शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे. शहरात करण्यासारखे बरेच काही आहे. तसे, या ठिकाणाला भारताची संगीत राजधानी देखील म्हटले जाते. चार दिवस आनंदाचे घालविण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी हे ठिकाण चांगले आहे.
 
7 हॅवलॉक बेट-जर आपल्याला शांतता आवडत असेल तर हॅवलॉक बेट हे सर्वोत्तम ठिकाण आहे. मार्च महिन्यात येथे हलकी आणि शांत समुद्राची वारे वाहतात. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झुंड : आमिर खान नागराज मंजुळेंचा सिनेमा पाहून म्हणाला, 'बच्चनसाहबने...