Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sri Lanka सुंदर श्रीलंका

shrilanka
, शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (18:19 IST)
island country in South Asia श्रीलंका हा भारताचा शेजारी देश. हिंदी महासागरातलं हे छोटं बेट आहे. हा देश भारताच्या दक्षिणेकडे आहे. सिलोन या नावाने हा देश ओळखला जात असे. 16 व्या शतकात पोर्तुगीज या बेटावर आले. त्यानंतर साधारण 100 वर्षांनी डचांनी श्रीलंकेवर आक्रमण केलं. 1796 मध्ये ब्रिटिशांचं आगमन झालं. 1948 मध्ये श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळालं. सुरूवातीच्या काळात श्रीलंकेत साम्यवाद होता. पण 1972 नंतर हा देश लोकशाहीकडे वळला आणि मग सिलोन अधिकृतपणे श्रीलंका म्हणून ओळखला जाऊ लागला. सिंहली ही इथली अधिकृत भाषा आहे. या देशातल्या लोकांवर बौद्ध धर्माचा पगडा आहे. तमिळ वंशाच्या लोकांची संख्याही इथे बरीच जास्त आहे. 4 फेब्रुवारी हा श्रीलंकेचा स्वातंत्र्यदिन आहे. 
webdunia
रबर, चहा, नारळ, तंबाखू तसंच इतर शेतमालावर प्रक्रिया करणारे उोग या देशात आहेत. या देशात भात, ऊस, विविध प्रकारची धान्यं, डाळी, तेलबिया, मसाले, चहा, रबर, नारळ, दूध, अंडी, मासे यांचं उत्पादन होतं. श्रीलंकेतून कपड्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. चहा आणि मसाले, हिरे, माणिक, नारळाशी संबंधित उत्पादनं, मासे यांचीही निर्यात मोठ्या प्रमाणावर केलीजाते. श्रीलंकन रूपया हे इथलं चलन आहे. सुंदर समुद्रकिनारे हे इथलं प्रमुख आकर्षण. कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी. महावेली ही इथली सर्वात मोठी नदी आहे. श्रीलंकेच्या दक्षिण-मध्य भागात उंच डोंगर आणि खोल दर्‍या आहेत. श्रीलंकेतलं वातावरण वर्षभर उष्ण आणि दमट असतं. देशाच्या दक्षिण-पश्चिम भागात भरपूर पाऊस पडतो. श्रीलंकेत जंगलाचं प्रमाणही बरंच जास्त आहे. बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, हत्ती, मोर, माकडं असे प्राणी इथे आढळतात. या देशात बरीच राष्ट्रीय उानंही आहेत.
 
वैष्णवी कुलकर्णी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सनी देओलने दिल्या 'आत्मपॅम्फ्लेट'ला शुभेच्छा