Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रवास करतांना सोबत घेऊन जा हे पदार्थ, होत नाहीत खराब

travel
, शनिवार, 6 एप्रिल 2024 (20:30 IST)
Travel Friendly Food : प्रवास म्हणजे नवीन ठिकाणी जाणे, नवीन नवीन जागा बघणे, पण जेव्हा आपण प्रवासाला निघतो. तेव्हा काही वेळेस काय खावे? अशी समस्या निर्माण होते. प्रवासात खाण्याचे पदार्थ लवकर खराब होतात, किंवा खाण्यायोग्य राहत नाही. प्रवास करतांना प्रश्न पडतो की, काय घेऊन जावे सोबत जे खराब देखील होणार नाही आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले असतील. चला तर जाणून घ्या असे काही पदार्थ आहे जे प्रवास करतांना तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात. 
 
ड्रायफ्रूट्स : प्रवास करतांना ड्रायफ्रूट्स खूप लाभकारी असतात. हे चविष्ट असतात आणि ते शक्तिवर्धक असतात. बादाम, काजू, आकरोट आणि किशमिश सारखे ड्रायफ्रूट्स खूप वेळपर्यंत टिकतात. 
 
कोरडी भाजी- कोरडी भाजी किंवा नमकीन खूप वेळपर्यंत ताजे राहतात. प्रवास करतांना चहा सोबत हे पदार्थ खातांना सुखद अनुभव मिळतो. 
 
कणकेची बिस्कीट- कणकेची बिस्किटे खूप वेळपर्यंत ताजे राहतात. हे बिस्कीट तयार करून सोबत घेऊन जाणे सोपे असते. 
 
पराठे- बटाटा पराठे किंवा इतर भाज्यांचे पराठे खूप वेळपर्यंत ताजे राहतात. पराठे हे घरी बनवून घेऊन प्रवास करतांना खायला वेगळाच अनुभव मिळतो. 
 
थेपले- प्रवास करतांना थेपले हा एक चांगला पर्याय आहे तसेच थेपले हे खूप वेळ टिकतात. आजच्या काळात थेपले सर्वीकडे मिळतात. थेपले हे चविष्ट देखील असतात आणि आरोग्यवर्धक असतात. 
 
या पदार्थांना चांगल्या प्रकारे पॅक करून प्रवासामध्ये सोबत घेऊन गेल्यास उपाशी राहावे लागत नाही तसेच आपण प्रवासाचा आनंद देखील घेऊ शकतो. आपले आरोग्य आपल्यासाठी महत्वपूर्ण असते. याकरिता प्रवासात खाण्याच्या पदार्थांसोबत चांगले आरोग्य असणे हे देखील महत्वाचे असते. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुष्पा 2 मधील रश्मिका मंदान्नाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज