Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन वर्षात बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी, हिमाचल प्रदेशातील ही पाच ठिकाणी आवर्जून भेट द्या

नवीन वर्षात बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी, हिमाचल प्रदेशातील ही पाच ठिकाणी आवर्जून भेट द्या
, शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (22:24 IST)
जर आपल्याला थंडी आणि बर्फवृष्टीमध्ये नवीन वर्ष साजरे करायची इच्छा असल्यास, तर आपण सुंदर मैदाने आणि बर्फवृष्टीमध्ये साजरे करण्यासाठी  हिमाचल प्रदेशला भेट देऊ शकता. तसे, देशात अनेक डोंगरी पर्यटन क्षेत्रे आहेत जी आपणास आवडतील. पण हिमाचल प्रदेशात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे डिसेंबर-जानेवारीमध्ये भेट देणे योग्य आहे. आपण आपल्या कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासह येथे जाऊ शकता. नववर्षानिमित्त येथे अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जातात. चला तर मग जाणून घेऊया हिमाचल प्रदेशातील त्या पाच ठिकाणांबद्दल, जिथे नववर्षानिमित्त बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.
 
1 शिमला : हिवाळा असो, बर्फवृष्टी असो किंवा पर्वतभाग असो, शिमलाचे नाव सर्वप्रथम येते. नवीन वर्षाच्या निमित्ताने बर्फवृष्टी पाहायची असेल तर शिमल्यात नक्की जा. हिमवर्षावासाठी शिमला हे हिमाचलमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
 
2 कुल्लू : हिवाळ्यातील हिमाचल प्रदेशातील शिमल्याशिवाय कुल्लू हे पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. कुल्लू हे स्वर्गापेक्षा कमी नाही. हिवाळ्यात येथे बर्फवृष्टीची चित्तथरारक दृश्ये आहेत. पांढर्‍या चादरीने झाकलेल्या शिखरांमध्‍ये आपण जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत फोटो काढू शकता. 
 
3 कुफरी: हिमाचल प्रदेशातील शिमला येथे भटकंतीला गेलात तर कुफरीलाही  भेट द्यायला हवी. शिमला ते कुफरी हे अंतर सुमारे 15 किमी आहे. शिमला ते कुफरी हा प्रवास एका तासापेक्षा कमी वेळात करता येतो. कुफरीमध्ये आपण  घोडेस्वारी, जीप राईड, सफरचंदाच्या बागा पाहू शकता. येथे आपल्याला अनेक प्रकारचे अडव्हेंचर्स पर्यायही मिळतील. डिसेंबर-जानेवारीमध्ये इथे बर्फवृष्टी पाहायला मिळते, जे आपल्याला आनंदी करतात. 
 
4 किन्नौर :देवांची भूमी, किन्नौर हिमाचलमध्ये स्थित आहे. हे शिमल्यापासून सुमारे 235 किमी अंतरावर आहे. किन्नौरच्या भूमीवर हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. हिवाळ्यात ते वंडरलैंडमध्ये बदलते. 
 
5 पराशर तलाव : हिमाचल प्रदेशातील पराशर तलाव हे एक सुंदर ठिकाण आहे, येथे जाणे चुकवू नका. पराशर तलाव  हे हिमालय पर्वतरांगांच्या मध्यभागी वसलेले आहे. पराशर तलाव मंडी जिल्ह्यापासून 50 किमी अंतरावर आहे. 8956 फूट उंचीवर असलेल्या या तलावाजवळ आपल्याला नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळेल. शांत आणि सुंदर या ठिकाणी या हंगामात बर्फवृष्टी होते. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी भन्नाट जोक : पोस्टमनशीच लग्न केलं