कार्तिकी एकादशीला तुळशी विवाहाचे महत्व खूप मानले जाते. तसेच तुळशी विवाह केल्याने भाग्य उजळते. तुळशी विवाह हे सुख, समृद्धी आणि सौभाग्य यांचे प्रतीक मानले जाते. तसेच देशात असे एक तुळशीचे मंदिर आहे जिथे तुळशी विवाहाच्या दिवशी दर्शन घेतल्यास भाग्य लाभते अशी मान्यता आहे. तुळशीविवाहाच्या या दिवशी लोक मंदिरात येतात आणि तुळशी मातेची पूजा करतात.हे मंदिर वाराणसी मध्ये स्थित आहे. या मंदिराला तुळशी मानस मंदिर म्हणून देखील ओळखले जाते.
वाराणसीतील तुलसी मानस मंदिराच्या भिंतीवर रामचरितमानसचे दोहे आणि चौपाई कोरलेली आहे. हे मंदिर 1964 च्या सुमारास कलकत्ता येथील एका व्यावसायिकाने बांधले होते. तेव्हापासून आतापर्यंत या मंदिराचे सौंदर्य कमी झालेले नाही. या सुंदर मंदिरात भगवान राम, सीता माता, लक्ष्मण आणि हनुमानजींच्या मूर्ती पाहायला मिळतात. तसेच तुलसी विवाहाच्या दिवशी या मंदिरात जाणे शुभ मानले जाते. वाराणसीमध्ये असलेल्या या मंदिरात तुळशी विवाहाच्या दिवशी विशेष गर्दी जमते. या दिवशी मंदिरात जाणे शुभ मानले जाते. या मंदिराचा तुळशीशी संबंध नसला तरी त्याच्या नावात तुळशी हा शब्द असल्याने त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होतात. वाराणसीला गेल्यानंतर या मंदिराला भेट देऊ शकता.
मान्यतेनुसार तुलसीदासांनी याच ठिकाणी रामचरितमानसाची रचना केली होती. त्यामुळे या मंदिराला तुळशी मानस असे नाव पडले. वाराणसीच्या सुंदर मंदिरांच्या यादीत या मंदिराचा देखील समावेश होतो.