Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

उन्हाळ्यात या लोकप्रिय हिल स्टेशनला भेट द्या,आणि सुट्ट्या आनंदात घालवा

उन्हाळ्यात या लोकप्रिय हिल स्टेशनला भेट द्या,आणि सुट्ट्या आनंदात घालवा
, मंगळवार, 3 मे 2022 (20:30 IST)
उन्हाळी सुट्ट्या येणार आहेत आणि या दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्टीची प्रत्येक घरात चर्चा सुरू आहे. मित्र आणि कुटुंबियांसोबत निवांत क्षण घालवण्यासाठी लोक काही चांगली ठिकाणे शोधत आहेत. उन्हाळ्यात कुठे जायचे? किती पैसे लागतील? योग्य मार्ग कोणता? तेथील पर्यटकांच्या दृष्टीने चांगली ठिकाणे कोणती आहेत. चला तर मग भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेऊ या. 
 
1 चित्कुल (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील चित्कुल हे एक सुंदर गाव आहे.बसप नदीच्या काठावर वसलेले चितकुल भारत- तिबेट च्या सीमेवर वसलेले हे शेवटचे गाव आहे जिथे भारतीय कोणत्याही परवानगी शिवाय मुक्तपणे फिरू शकतात. 
खर्च - सुमारे रु 15,000
कसे जायचे - चित्कुलला कार, बस, ट्रेन किंवा विमानाने पोहोचता येते. चित्कुलचे सर्वात जवळचे विमानतळ भुंतर आहे.आणि  जवळचे रेल्वे स्टेशन कालका आहे. सेल्फ ड्रायव्हिंग करणारे लोक दिल्ली-चंदीगड-शिमला-करचम मार्गे चितकुलला पोहोचू शकतात. 
प्रेक्षणीय स्थळे- भारतातील शेवटचा ढाबा, मठी मंदिर, बसपा नदी, हायड्रो फ्लोअर मिल, बौद्ध मंदिर, सफरचंद बाग आणि चितकुल किल्ला.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ - जून 
 
2 मॅक्लिओड गंज (हिमाचल प्रदेश) - मॅक्लिओड गंज हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील एक छोटेसे ठिकाण आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 6,381 फूट उंचीवर आहे. अध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी येथे मुक्काम केल्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठीही मुख्य आकर्षण आहे. मॅक्लिओडगंज हे त्याच्या आकर्षक मठासाठी आणि सुंदर दृश्यांसाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
खर्च - सुमारे 10,000 रु .
कसे जायचे - तुम्ही कार, बस, ट्रेन  किंवा फ्लाइटने मॅक्लॉडगंजला पोहोचू शकता. मॅक्लिओडगंजचे सर्वात जवळचे विमानतळ गग्गल विमानतळ आहे आणि सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन अंब अंदौरा आहे. वाहनाने तुम्ही दिल्ली-सोनीपत-पानिपत-कर्नाल-अंबाला-रूपनगर-आनंदपूर साहिब आणि नांगल मार्गे मॅक्लॉडगंजला पोहोचू शकता. 
प्रेक्षणीय स्थळे-त्रिंउंड , भागसू धबधबा, भागुनाथ मंदिर, नामग्याल मठ, कांगडा किल्ला.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ- मे जून 
 
3 अल्मोडा (उत्तराखंड) - उत्तराखंडमधील अल्मोडा हे नाव उत्तर भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये गणले जाते. हे ठिकाण उत्तराखंडच्या कुमाऊं पर्वतात आहे.अल्मोडाची लोकसंख्या 35,000 च्या आसपास आहे. अलमोडा पर्यटकांमध्ये अद्वितीय हस्तकला, ​​प्राचीन मंदिरे आणि निसर्गाच्या अद्भुत दृश्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
खर्च - सुमारे 10,000 रु .
कसे जायचे  - कार, बस, ट्रेन किंवा फ्लाइटने अल्मोडा गाठता येते. पंतनगर विमानतळ अल्मोडापासून सर्वात जवळ आहे आणि काठगोदाम हेसर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही दिल्ली-मुरादाबाद-रुद्रपूर-हल्द्वानी-रानीखेत मार्गे अल्मोडा गाठू शकता. 
प्रेक्षणीय स्थळे-ब्राइट एंड कॉर्नर, गोविंद बल्लभ संग्रहालय, चिताई गोलू देवता मंदिर, कालीमठ अल्मोडा आणि कासार देवी मंदिर पाहण्यासाठी
सर्वोत्तम वेळ - एप्रिल ते जुलै 
 
4 कूर्ग (कर्नाटक) - कर्नाटकातील कुर्ग हे टोकदार शिखरे आणि सुंदर दऱ्यांचा गड आहे. कौटुंबिक सुट्टीसाठी हे भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये गणले जाते. चहाच्या बागा, हिरवीगार जंगले आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी लोक लांबून येतात. मित्रांसोबत छान ठिकाणी फिरणे असो किंवा पत्नीसोबत हनिमूनला जाणे असो, कूर्ग फिरण्यासाठी खूप खास आहे. 
खर्च - सुमारे 25,000-30,000 रु .
कसे जायचे - कूर्गला जाण्यासाठी रेल्वे किंवा हवाई मार्ग अधिक चांगला असेल. याच्या सर्वात जवळचे मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि रेल्वे स्टेशन म्हैसूरमध्ये आहे 
प्रेक्षणीय स्थळे - दुबरे एलिफंट कॅम्प, अॅबे व्हॅली, नागरहोल नॅशनल पार्क, ओंकारेश्वर मंदिर, चेतली.
भेट देण्याची उत्तम वेळ - ऑक्टोबर ते मार्च 
 
5 नैनिताल (उत्तराखंड) - उत्तराखंडमधील नैनिताल हे एप्रिल ते जून या कालावधीत भेट देण्याचे खूप छान ठिकाण आहे. हे सुंदर हिलस्टेशन हिरवेगार पर्वत आणि तलावांनी वेढलेले आहे. हे समुद्रसपाटीपासून सुमारे 6,837 फूट उंचीवर वसलेले आहे. नैनितालच्या डोंगरावरून 2 मैल पसरलेल्या आंब्याच्या आकाराच्या तलावाचे सुंदर दृश्यही दिसते. 
खर्च - सुमारे 5,000 रु .
कसे जायचे - दिल्ली-NCR ते नैनिताल हे अंतर फक्त 323 किमी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही गाडी, बस किंवा ट्रेनने हिलस्टेशनवर सहज पोहोचू शकता. काठगोदाम हे इथले सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही दिल्ली-मुरादाबाद-तांडा-दडियाल-बाजपूरहून कालाधुंगी मार्गे नैनितालला पोहोचू शकता. 
प्रेक्षणीय स्थळे- नैनिताल तलाव, नैना शिखर, कैंची धाम, नैना देवी मंदिर आणि इको केव्ह गार्डनला भेट देण्यासाठी
सर्वोत्तम वेळ- एप्रिल ते जून आणि डिसेंबर ते जानेवारी 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुनील शेट्टीने मुलगी अथियाच्या लग्नाची तयारी सुरू केली !