Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

'भारतरत्न लाल बहादूर शास्त्री'

lal bahadur shastri
, गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (17:13 IST)
भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 1904 मध्ये उत्तरप्रदेशातील मुगलसराय या ठिकाणी एका कायस्थ कुटुंबात मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव यांचा कडे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते, त्यासाठी त्यांना सगळे मुंशी म्हणत होते. यांचा आईचे नाव रामदुलारी होते. हे आपल्या कुटुंबातील सर्वात लहान असल्यामुळे त्यांना 'नन्हें' म्हणायचे. ते फार लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. ते आपल्या आईबरोबर त्यांच्या आजोळी गेले तिथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून शिक्षण घेतले. काशी विद्यापीठातून त्यांना 'शास्त्री'ची पदवी मिळाली. त्यांनी आपले जातिसंज्ञा असलेले श्रीवास्तव नेहमी साठी काढून टाकले आणि शास्त्री उपनाव लावले आणि लाल बहादूर शास्त्री नावाने ओळखले गेले.
 
त्यांचे लग्न मिर्झापूर येथे राहणाऱ्या गणेशप्रसाद यांची मुलगी ललिता यांच्यासोबत 1928 मध्ये झाले. त्यांना 6 अपत्ये झाली. दोन मुली कुसुम, सुमन आणि 4 मुले हरिकृष्ण, अनिल, सुनील आणि अशोक. त्यांच्या चारही मुलांपैकी आता फक्त दोनच हयातीत आहे. संस्कृत भाषेत स्नातक स्तरावरील शिक्षण घेउन ते भारत सेवा संघाशी जुडले आणि देश सेवा करण्याचे ठरवून राजकीय कारकिर्दी सुरु केली. शास्त्री हे गांधी वादी होते. भारतीय स्वातंत्र्याच्या लढाच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. त्यांनी 1921 मध्ये असहकार चळवळीत, 1930 दांडी मार्च,आणि 1942 भारत छोडो आंदोलनात प्रामुख्याने भाग घेतले असे.
 
त्यांनी 'मरो नाही मारो' चा नारा दिला. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना देशाचे पंतप्रधान केले गेले. त्यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितले की अन्नधान्याच्या किमती वाढण्यापासून रोखणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. 'जय जवान जय किसान' च्या घोषणेने भारतातील लोकांचे मनोबल वाढले. आणि संपूर्ण देश एक झाला. ते अहिंसेचे याजक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1952 च्या निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले आणि रेल्वे मंत्री झाले. एका रेल्वेच्या अपघातानंतर त्यांनी त्याची नैतिक जवाबदारी स्वीकारून त्या पदावरून राजीनामा दिला. त्यांचा कारभार चोख होता. नंतर ते व्यापार आणि उद्योग मंत्री झाले. 1961 मध्ये ते गृहमंत्री झाले. 9 जून 1964 पासून ते भारताचे पंतप्रधान झाले. 1965 मध्ये भारत आणि पाकच्या युद्धात पाकिस्तानावर भारताने विजय मिळविला. ही शास्त्रीजींच्या कारकिर्दीत देशातील सर्वोच्च कामगिरी होती. त्यांचा आदेशावरूनच सामर्थ्य व आत्मबळाने भरलेल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव केला.   
 
त्यांचा मृत्यूविषयी वेगवेगळे अनुमान लावण्यात आले आहे. त्यांचा मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले, तर काही जण अन्नातून विषबाधा झाल्यामुळे झाली असे सांगत आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याचा सामना करत भारतीय सैन्याने लाहोरवर हल्ला केला अमेरिकेने लाहोरमधील अमेरिकी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काही काळ युद्धबंदीची मागणी केली रशिया आणि अमेरिकाने फार प्रगती केली. 
 
भारताच्या पंतप्रधानांना रशियाच्या ताशकंद करारावर बोलविण्यात आले. शास्त्रीजींनी ताश्कंद कराराच्या सर्व अटी मान्य केल्या. आंतरराष्ट्रीय दबावाखाली यांना ताश्कंद करारावर स्वाक्षरी करावी लागली. परंतु त्यांनी पाकिस्तानला ही जमीन देण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या पंतप्रधान अयुब खान यांच्यासह युद्धबंदीवर स्वाक्षरी झाल्याच्या काही तासानंतरच भारताच्या पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे नमूद झाले. 11 जानेवारी 1966 रोजी रात्री भारताच्या या वीरपुत्राचे देशाच्या तत्कालीन पंत प्रधानाचे निधन झाले. त्याच्या कार्याच्या अजोड प्रतिमेमुळे त्यांना 'भारतरत्नाचा' खिताब दिला होता. 
 
शास्त्रीजी आपल्या साधेपणा, देशप्रेम आणि प्रामाणिकपणासाठी आजतायगत भारताच्या लोकांच्या मनात जिवंत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षणाचा लढा तीव्र, येत्या 6 ऑक्टोबरला 'मातोश्री'बाहेर आंदोलन, 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद