Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रांतिवीर नेताजी सुभाष चंद्र बोस

क्रांतिवीर नेताजी सुभाष चंद्र बोस
, गुरूवार, 23 जानेवारी 2020 (12:27 IST)
क्रांतिवीर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशाच्या कटक येथे हिंदू कायस्थ कुटुंबात झाला. ह्यांचा वडिलांचे नावं जानकीनाथ बोस आणि आईचे नावं प्रभावती होते. प्रभावती कोलकाताच्या नामवंत कुटुंब दत्त कुटुंबातील होत्या. यांचे वडील गंगनारायण दत्त होते. 
 
जानकीदास कटकचे नामवंत वकील होते. आधी त्यांनी शासकीय वकील म्हणून काम केले नंतर त्यांनी खासगी स्वरूपाने वकिली करण्यास सुरू केले. बंगाल विधानसभेचे ते अध्यक्ष होते. ब्रिटिश शासनाने त्यांना रायबहादूरची पदवीने सन्मानित केले. प्रभावती आणि जानकीदास यांना 6 मुली आणि 8 मुले अशी एकूण 14 अपत्ये झाली. सुभाष हे 9 व्या क्रमांकावर होते आणि मुलांमध्ये त्यांचा 5 वा क्रमांक होता. शरद बाबू हे सुभाष यांचे थोरले बंधू असे. सुभाष त्यांना "मेजदा" म्हणून हाक लावायचे. सुभाष वर त्यांचा जास्त जीव असे. शरद ह्यांच्या पत्नीचे नावं विभावती होय.
 
सुभाष यांनी कटक येथील प्रोटेस्टेण्ट शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यावर 1990 साली रेवेनशा कॉलेजियेट शाळेत प्रवेश घेतले. त्यांच्या प्राचार्यांचे सुभाषच्या मनांवर विशेष प्रभाव पडले. वयाच्या 15 व्या वर्षी सुभाष यांनी विवेकानंद साहित्याचा सखोल अभ्यास केला. 1915 साली त्यांनी 12 वीची परीक्षा आजारी असून द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली. 1916 साली बीए करत असताना कॉलेजातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भांडण झाले. सुभाष यांनी पुढाकार घेतल्याने ह्यांना कॉलेजातून काढण्यात आले. 
 
सेनेत भरती होण्याची यांची तीव्र इच्छा असल्याने 49 व्या बंगाल रेजिमेंट साठी प्रवेश परीक्षा दिली पण त्यात अपात्र ठरले. स्कॉटिश चर्च कॉलेजात प्रवेश घेऊन आर्मीत प्रवेश घेण्याची इच्छा मनात बाळगून ठेवलेली असताना टेरिटोरियल आर्मीची प्रवेश परीक्षा दिली. त्यात यशस्वी होऊन लेफ्टनंट म्हणून फोर्ट व्हिलियम आर्मीत प्रवेश घेतले. त्याच बरोबर 1919 साली बीए (ऑनर्स) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली तर कोलकाता विश्वविद्यालयात दुसऱ्या क्रमांकावर होते.
 
सुभाष यांच्या वडिलांची इच्छा सुभाषने आयसीएस होण्याची होती. त्यास वयाची अट असल्याने एकदाच परीक्षा देण्यात येईल असे कायदे होते त्यामुळे त्यांनी विचार करून परीक्षा देण्यासाठी 15 सप्टेंबर1919 रोजी ते इंग्लंडला गेले पण तिथे कुठल्याही शाळेत प्रवेश न मिळाल्याने किट्स विल्यम हॉल मध्ये प्रवेश घेऊन 1920 साली आयसीएसच्या परीक्षेत विशिष्ट सूची मध्ये 4थ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले. पण त्यांचा मनांवर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद घोष यांचे विचार मनावर रुतल्यामुळे त्यांना आयसीएस बनून ब्रिटिशांची गुलामी करणे मान्य नव्हते. यामुळेच  त्यांनी आयसीएस पदावरून राजीनामा दिला. त्यांचा ह्या निर्णयाला त्यांचा आईने स्वीकृती दाखवली.  
 
जून 1921 साली त्यांनी मानसिक आणि नैतिक शास्त्रात पदवी घेऊन स्वदेशी परतले. कोलकाताच्या स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजनदास यांच्या कार्याला प्रेरित होऊन त्यांच्या बरोबर काम करण्याची इच्छा यांनी दाखवली. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर( टागोर) यांच्या सांगण्यावरून भारतात आल्यावर मुंबईत जाऊन महात्मा गांधी यांना भेटले त्यांनी यांना दास बाबूंबरोबर काम करण्यास सांगितले. 
 
त्या काळात ब्रिटिश शासनाविरुद्ध आंदोलन सुरू होते. बंगाल येथे दास बाबूंच्या नेतृत्वात ते सहभागी झाले. 1922 मध्ये दास बाबूंनी कॉंग्रेसच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. सुभाष देशाचे महत्त्वाचे युवा नेते झाले. सुभाष यांनी कॉंग्रेसच्या अंतर्गत युवा स्वातंत्र्य लीगची सुरुवात केली. 1927 साली सायमन कमिशन भारतात आल्याने कॉंग्रेसने त्याचा प्रतिकार केला आणि मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांचे आयोगाची स्थापना करून सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी भारतीय संविधान तयार करण्याचे काम सोपविले. 
 
मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन झाले. त्या काळात गांधीजी पूर्ण स्वराज्याशी सहमत नव्हते. त्यांनी या अधिवेशनात ब्रिटिश शासनांकडून औपनिवेशिक स्वराज्य (डोमिनियन स्टेटस) ची मागणी केली. पण त्यांच्या या निर्णयाला जवाहरलाल नेहरू आणि सुभाष यांचा विरोध होता. मग निर्णय घेतले की औपनिवेशिक स्वराज्य (डोमिनियन स्टेटस) साठी 1 वर्षाची मुदत देण्यात येईल. पण ब्रिटिश शासनाने ही अट अमान्य केली. नंतर जवाहरलाल नेहरू यांचा अध्यक्षेत लाहोर येथे कॉंग्रेसचे अधिवेशनात निर्णय घेण्यात आला की 26 जानेवारीचा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरे करणार. पण गांधीजींच्या मताशी असहमत होऊन त्यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडून स्वतःची "आजाद हिंद फौज" भारतीय राष्ट्रीय शक्तिशाली पार्टीची स्थापना केली. त्यांचा मतानुसार भारताला एक स्वातंत्र्य देश बनविण्यासाठी गांधीजींची अहिंसक विचारधारा काही कामाची नाही. ब्रिटिश शासनाशी लढण्यासाठी त्यांनी आजाद हिंद फौज बनवली. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्त करण्यासाठी "मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन" या त्यांच्या महान शब्दांनी आपल्या सैनिकांना प्रेरित केले.  
 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 1945 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाल्याचे समजते. ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी त्याच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या सर्व आशा त्यांच्या मृत्यूच्या वाईट बातमीने संपल्या. त्यांच्या मृत्यूनंतरही, तो कधीही न संपणारी प्रेरणा म्हणून भारतीय लोकांच्या अंतःकरणामध्ये आपल्या आवेशी राष्ट्रीयतेसह जिवंत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही- छगन भुजबळ