Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत तुलसीदास पुण्यतिथी

Tulsi das
, मंगळवार, 30 जुलै 2024 (11:52 IST)
भारत ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. भारतवर्षात अनेक महान संत होऊन गेलेत. त्यापैकीच एक महान संत आहे संत तुलसीदास. आज संत संत तुलसीदास यांची पुण्यतिथी आहे. संत तुलसीदास हे मध्यकालीन हिंदी साहित्याचे महान कवी होते. तसेच ते परम रामभक्त होते. 
 
संत तुलसीदास यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील यमुना नदीच्या काठावर चित्रकूटच्या राजापूर नावाच्या गावात झाला होता. तसेच नंतर किशोर वयात आल्यानंतर त्यांचा विवाह रत्नावली सोबत झाला  होता. जेव्हा पत्नी माहेरी गेली त्यांना राहवले नाही. तुलसीदासांचे पत्नीवर नितांत प्रेम होते. तुलसीदास पत्नीला भेटण्यासाठी रात्री नदीमधून पोहत गेले. व रत्नावली ने तुलसीदासांना खूप रागावले. यानंतर तुलसीदासांनी संसाराचा त्याग केला. व पवित्र शहर प्रयाग करीत निघून गेले. व गृहस्थाश्रमाचा त्याग करून त्यांनी साधुत्व पत्करले. तसेच भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन झाले. यानंतर त्यांनी श्रीरामचरितमानसची रचना आरंभ केली. संत तुलसीदासांना श्रीरामचरितमानसचे रचियता देखील म्हणतात. 
 
तसेच तुलसीदासांनी अखंड प्रभू श्रीरामाची भक्ती केली. विलक्षण तेज त्यांच्यामध्ये निर्माण झाले होते. एकदा संत तुलसीदास हनुमानाचे ध्यान करीत होते. तेव्हा हनुमानजींनी साक्षात प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले व प्रार्थनाचे पद रचण्यास सांगितले, यानंतर त्यांनी आपली शेवटची कृति विनय-पत्रिका लिहली आणि तिला भगवंताच्या चरणात अर्पित केले. प्रभू श्रीरामांनी स्वतः त्यांना आशीर्वाद दिले.
 
यानंतर संवत्‌ 1680 मध्ये संत तुलसीदासांनी "राम-राम" म्हणत आपले शरीर त्यागले. संत तुलसीदास हे भारतवर्षातील महान संत होते. ज्यांनी श्रीरामचरितमानस लिहले. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs SL: टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेत पोहोचली, रोहित विराट दिसणार