Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Valmiki Jayanti 2024: कोण होते महर्षी वाल्मिकी, सम्पूर्ण माहिती जाणून घ्या

Rishi Valmiki
, गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (10:10 IST)
Valmiki Jayanti 2024 :रामायणाचे लेखक वाल्मिकीजी हे वास्तवात एक डाकू होते. वाल्मिकी जयंती म्हणजे या दिवशी महान लेखक वाल्मिकी जी यांचा जन्म झाला .रामायण या महान ग्रंथाचे रचयिते ऋषी वाल्मिकी होते. वाल्मिकीजींचा जन्म अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, या दिवसाला हिंदू धार्मिक दिनदर्शिकेत वाल्मिकी जयंती म्हणतात . यंदा वाल्मिकी जयंती 17 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे.

वाल्मिकीजींच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखे आहे, त्यांचे व्यक्तिमत्व सामान्य नव्हते. त्यांच्या आयुष्यातील एका घटनेने प्रेरित होऊन, त्याने आपला जीवन मार्ग बदलला, 
 
महर्षि वाल्मिकीं यांचे नाव रत्नाकर होते आणि ते जंगलात राहणाऱ्या भिल्ल जातीत वाढले होते, त्यामुळे त्यांनी भिल्लांची परंपरा स्वीकारली आणि उपजीविकेसाठी ते डाकू बनले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते रस्त्यावरून जाणाऱ्यांना लुटायचे  आणि गरज पडेल तेव्हा मारायचे . 
 
एके दिवशी महर्षी नारद मुनी जंगलातून जात असताना डाकू रत्नाकरने त्यांना बांधून ठेवले. महर्षी नारद मुनींनी डाकूला विचारले तू अशी पाप कशाला करतो. त्यावर त्याने उत्तर दिले. मी माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. यावर महर्षी नारदमुनी म्हणाले , ज्यांच्यासाठी तू हे सर्व पाप करत आहेस ते तुझ्या या पापात भागीदार होणार का? 
या वर रत्नाकरने उत्तर दिले हो करणार , ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणार. यावर नारद मुनी म्हणाले, एकदा तू तुझ्या कुटुंबियांना तरी विचार असे झाले तर मी तुला माझी संपत्ती देईन. 

रत्नाकरने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना माझा साथ देणार का असे विचारल्यावर सर्वांनी नकार दिला. या गोष्टीचे  त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी वाईट कर्म करणे सोडले आणि  तपश्चर्येचा मार्ग निवडला. त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि वाल्याच्या वाल्मिकी झाला. त्यांना ऋषी वाल्मिकी असे नाव मिळाले. त्यांनी महान ग्रंथ रामायणाची संस्कृत भाषेत निर्मिती केली. 
 
रामायण लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली?
रत्नाकर यांना  जेव्हा आपल्या पापांची जाणीव झाली तेव्हा त्यांनी पापाचे ते जीवन सोडून नवीन मार्ग स्वीकारायचा होते, परंतु त्यांना या नवीन मार्गाबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांनी नारदजींना मार्ग विचारला, तेव्हा नारदजींनी त्यांना रामनामाचा जप करण्याचा सल्ला दिला.

रत्नाकरने बराच वेळ राम नामाचा जप केला, पण अज्ञानामुळे चुकून त्याचा रामराम नामाचा जप मरा मरा झाला, त्यामुळे त्याचे शरीर अशक्त झाले आणि मुंग्यांनी त्याच्यावर हल्ला केला. कदाचित हीच त्याच्या पापांची शिक्षा असावी. त्यामुळे त्यांना वाल्मिकी असे नाव पडले. परंतु कठोर तपश्चर्येने त्यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न केले, परिणामी ब्रह्मदेवांनी त्यांना ज्ञान दिले आणि रामायण लिहिण्याची क्षमता दिली, त्यानंतर  महर्षीं वाल्मिकीनी रामायण रचले. त्यांना रामायणाचे पूर्वीचे ज्ञान होते.
 
त्यांनी पहिला श्लोक कसा रचला?
एकदा ते गंगा नदीच्या काठी तपश्चर्येसाठी गेले असता एका पक्ष्याचे जोडपे प्रणय लीला करत असताना एका शिकारीने बाण मारून त्या नर पक्ष्याला ठार मारले.ते दृश्य पाहून त्याच्या मुखातून आपोआप एक श्लोक निघाला जो पुढीलप्रमाणे होता-
 
मां निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥
 
अर्थ : ज्या दुष्टाने हे घृणास्पद कृत्य केले त्याला जीवनात कधीही सुख मिळणार नाही.त्या दुष्टाने प्रेमात पडलेल्या पक्ष्याचा वध केला आहे. यानंतर महान कवीने रामायण रचले.
 
Edited by - Priya Dixit    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस खासदार आणि जेडीयूच्या आमदाराला जीवे मारण्याच्या धमक्या