ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. कालपासून जिल्ह्या-जिल्ह्य़ात ओबीसी आरक्षणासहित सोडत जाहीर होत आहे. मुंबई महानगर पालिकेची सोडत जाहीर होणार आहे. मात्र यावर भाजपाने आक्षेप घेतला आहे.ओबीसी आरक्षण सोडतीत नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यासंदर्भात आमदार मिहीर कोटेचा यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.
गेल्या तीन निवडणूकांमध्ये एखाद्या वाॅर्डमध्ये ओबीसी आरक्षित पडला असेल तर नियमांनुसार तो आरक्षित करावा लागतो. असे एकूण ५३ वाॅर्ड आहेत. या वाॅर्डचा समावेश आजच्या सोडतीत होवू नये असा भाजपाचा आग्रह आहे. ५३ वाॅर्डमधील महिला ओबासी की सर्वसाधारण ओबीसी अशा पध्दतीने गटवारी होणे गरजेची आहे. जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर भाजप कोर्टात जाणार असा इशारा मुंबई आयुक्तांना दिला आहे.