Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्रींचे स्कोअरकार्ड

अभिनेत्रींचे स्कोअरकार्ड

वेबदुनिया

, बुधवार, 23 डिसेंबर 2009 (17:16 IST)
कतरीना कैफ (न्यूयॉर्क, ब्ल्यू, अजब प्रेम की गजब कहानी, दे दना दन)
कतरीना कैफ आणि यश हे समीकरण बनले आहे. एकामागोमाग एक यशस्वी चित्रपट ती देते आहे. शो पीस म्हणून हिणवली जाणार्‍या कतरीनाने अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. न्यूयॉर्कमध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. अजब प्रेम...मध्ये तिची रणबीर कपूरची जोडी चांगली जमली. सलमानपासून ती दुरावल्याचे दिसले. त्याचवेळी रणबीरच्या जवळ आली हेही या वर्षात जाणवले.

प्रियंका चोप्रा (व्हॉट्स यूवर राशी, कमीने, बिल्लू)
प्रियंका चोप्रा गेल्या वर्षाइतकी या वर्षी यशस्वी ठरली नाही. पण तिच्या स्टार व्हॅल्यूवर यामुळे काही फरक पडला नाही. व्हॉट्स युवर राशीमध्ये तिने साकारलेल्या बारा भूमिकांचे कौतुक झाले. भलेही चित्रपट पडला, तरी वैयक्तिकरित्या तिला फायदाच झाला. कमीनेतील 'स्विटी' मात्र सगळ्यांना आवडली. बिल्लूमध्ये तिने शाहरूखखातर एक गाणे केले.

करीना कपूर (कुर्बान, मै और मिसेस खन्ना, कम्बख्त इश्क, बिल्लू)
एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपट देऊनही करीना चर्चेत असते. तिचे सगळेच चित्रपट या वर्षी फ्लॉप ठरले. मै और मिसेस खन्ना तर अतिशय वाईट पद्धतीने आपटला. कुर्बानमध्ये तिने उघडी पाठ दाखवली, तरीही रसिकांनी तिच्याकडेच पाठ फिरवली. कम्बख्त इश्कमध्ये बिनधास्त चुंबन दृश्य दिले, तरीही काही उपयोग झाला नाही.

राणी मुखर्जी ( दिल बोले हडिप्पा)
तरूण आहे हे भासविण्यसाठी राणीने शाहिद कपूरसोबत हा चित्रपट केला. त्यासाठी क्रिकेट खेलली. भांगडा केला. सरदार झाली. तरीही चित्रपट फ्लॉपच झाला. नव्या नायिकांसमोर राणीची पिछेहाट सुरू झाली आहे.

प्रीती झिंटा ( विदेश, मै और मिसेस खन्ना)
प्रीतीसाठी हे वर्ष वाईट गेले. नेस वाडिया या तिच्या प्रियकराशी तिचे फाटले. विदेश पडला. मै और मिसेस खन्नामध्ये जेमतेम एक गाणे केले. पण ते केले, असा प्रश्न तिला नंतर पडला असावा.

बिपाशा बसू (आ देखे जरा, ऑल दी बेस्ट)
'आ देखे जरा', फ्लॉप ठरला. नील नितिन मुकेशसोबत जोडी जमविण्याचा तिचा प्रयत्न फसला. ऑल दी बेस्ट यशस्वी ठरला, पण ते सांघिक यश होते. बिपाशा अजून लग्नही करत नाही आणि बॉलीवूडही सोडत नाही.

विद्या बालन (पा)
विद्याचे करीयर कासवाच्या गतीने चालतेय. ग्लॅमरस भूमिकात ती शोभत नाही, त्यामुळे तशा भूमिकांसाठी तिचा विचारच होत नाही. 'पा'मध्ये अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेत तिने जीव ओतला होता. आता आगामी इश्कियाकडून तिला मोठ्या अपेक्षा आहे.

दीपिका पदुकोण ( लव्ह आज कल, चांदनी चौक टू चायना)
लव्ह आज कलमध्ये दीपिकाच्या अभिनयाचे कौतुक झाले. चित्रपटही हिट झाला. पण दुसरीकडे तिचे विद्यमान लव्ह रणबीर कपूरशी तिचे 'ब्रेक अप' झाले. पण आता जुळल्याचेही कळतेय. चांदनी चौक टू चायना हा टुकार चित्रपट पडला.

असिन ( लंडन ड्रिम्स, दशावतार-डब)
लंडन ड्रिम्समधून यश मिळेल, असे असिनला वाटत होते. पण तसे घडले नाही. सलमान आणि अजय देवगण यांच्यासाठी हा चित्रपट तिने केला. पण हा चित्रपट स्वीकारून चूक केल्याचे तिला नंतर कळले.

लारा दत्ता ( ब्ल्यू, डू नॉट डिस्टर्ब, बिल्लू)
'बिल्लू'मध्ये गाव की गोरी बनलेल्या लाराने 'ब्ल्यू'मध्ये एकदम सेक्सी फिगर दाखवली. पण काही उपयोग झाला नाही. 'डू नॉट डिस्टर्ब' मधील कॉमेडी रोल लोकांना फार आवडला नाही. यावर्षी अपयशच तिला पहावे लागले.

कंगना ( राज- द मिस्ट्री कंटिन्यूज, वादा रहा)
राजच्या निमित्ताने तिला एक हिट लाभला. पण वादा रहा फ्लॉप ठरला. अध्ययन सुमनमुळे कंगना या वर्षी चर्चेत राहिला. पुढच्या वर्षी तिच्याकडून अधिक अपेक्षा आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi