Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलीवूड 2010 : अभिनेत्यांचा स्कोअरकार्ड!

बॉलीवूड 2010 : अभिनेत्यांचा स्कोअरकार्ड!

वेबदुनिया

IFM
अक्षय कुमार
(हाउसफुल, खट्टा मीठा, एक्शन रिप्ले, तीस मार खां)
मागच्या वर्षा सारखेच अक्षय कुमारचे चित्रपट फ्लॉप होण्याचा कार्यक्रम या वर्षी देखील सुरूच राहिला. खट्टा मिठाने तोंड कडू केले तर एक्शन रिप्लेला लोकांनी फास्ट फारवर्ड केले. हाउसफुलच्या सफलतेत काहीच मजा आला नाही. चित्रपटांची गोष्ट केली तर अक्की, सचिन तेंडुलकरचे उदाहरण समोर ठेवतो. त्याचे म्हणणे आहे की सचिन झिरोवर आऊट होत नाही का? भाऊ अक्षय, असं आठवत नाही की सचिनने लागोपाठ एवढी खराब बॅटिंग कधी केली असेल. अक्षयची सर्व उमेद तीस मार खाँ वर अवलंबून होती.

webdunia
IFM
सलमान खान
(दबंग, वीर)
जे लोक म्हणतात की सलमान ने आता अभिनय करणे सोडले पाहिजे तर ‘दबंग’च्या सफलतेमुळे त्यांना तोंडाची खावी लागली. चुलबुल पांडेच्या रूपात त्याने अशी दबंगता दाखवली की त्याचे चाहते खूश झाले. ‘दबंग’ सारख्या चित्रपटात फक्त सलमान खानच चालू शकतो. ‘वीर’च्या असफलतेमुळे सलमानचा या वर्षाचा स्कोर 1-1 राहिला. ‘वीर’च्या अपयशाचे त्याला वाईट वाटत आहे कारण त्याची कथा ही सल्लूनेच लिहिली होती. काही चित्रपटात त्याने लहान-सहान रोल केले आणि ‘बिग बॉस’ बनून लहान पडद्यावर देखील त्याने राज केला आहे.

webdunia
IFM
अभिषेक बच्च
(रावण, खेलें हम जी जान से)
जे लोक आधी पाठीवर बोलत होते ते आता तोंडावर बोलत आहे की जर छोटे बच्चन 'बिग बी'चा मुलगा नसता तर केव्हाच फिल्म इंडस्ट्रीमधून रिटायर झाला असता. ज्युनियर बच्चनाचे चित्रपट फ्लॉप होत आहे. ‘रावण’ला ना तर मणिरत्नम वाचवू शकले आणि ना ही ऐश्वर्या. ‘खेलें हम जी जान से’च्या पहिल्याच आठवड्यात शो कॅन्सल करण्याची वेळ आली होती. आपल्या एकट्याच्या दमावर चित्रपटाला चालवणे अजून ज्युनियर बच्चनाला जमत नाही.

webdunia
IFM
अमिताभ बच्चन
(रण, तीन पत्ती)
रण आणि तीन पत्ती बघून त्याचे प्रशंसकांनी देखील विचारले की 'बिग बी'या प्रकारचे चित्रपट का बरं करत आहे. ‘कौन बनेगा करोड़पती’च्या माध्यमाने त्यांनी छोट्या पडद्यावर आपले कला कौशल दाखवले. जाहिरात, ब्लॉग आणि ट्विटरच्या माध्यमाने त्यांनी स्वत:ला चर्चेत बनवून ठेवले.

webdunia
IFM
जॉन अब्राहम
(आशाएँ, झूठा ही सही)
जॉनने आपली इमेज या प्रकारे बनवून ठेवली आहे जसा तो सुपर स्टार आहे, पण खरं काही वेगळेच आहे. आमच्या गोष्टींवर विश्वास नसेल तर आशाएँ आणि झूठा ही सहीचे निर्माते आणि वितरकांना विचारायला पाहिजे. या चित्रपटांमुळे ते पूर्ण बुडाले आहे. आशाएँ निराशेत बदलली आणि झूठा ही सहीने जॉनच्या स्टारडमची वास्तविक स्थिती दर्शवली आहे.

webdunia
PR
अजय देवगन
(तीन पत्ती, अतिथी तुम कब जाओगे?, राजनीती, वंस अपॉन ए टाइम इन मुंबई, आक्रोश, गोलमाल3, टूनपुर का सुपरहीरो)
नि:संशयपणे या वर्षाचा सुपर स्टार अजय देवगनच आहे. वेग-वेगळ्या चित्रपटांत वेग-वेगळे रोल करून जेथे त्याने आपली अभिनय क्षमता सिद्ध केली, तर दुसरीकडे या चित्रपटांच्या सफलतेने त्याला दमदार स्टार म्हणून साबीत केले. गोलमाल 3 आणि अतिथी तुम कब जाओगेमध्ये त्याने दर्शकांचे खूब मनोरंजन केले. राजनीतीमध्ये तो एक कुशल खेळाडू म्हणून साबीत झाला आणि वंस अपॉन ए टाइम इन मुंबईमध्ये हाजी मस्तानच्या भूमिकेला त्याने जिवंत बनविले होते. गुपचुपतेने आवाज न करता त्याने सफलता मिळवून घेतली.

webdunia
IFM
रणबीर कपूर
(राजनीती, अंजाना अंजानी)
भविष्याचे सुपरस्टार रणबीर कपूरने ‘राजनीती’मध्ये आपल्या इमेजपेक्षा वेगळी भूमिका साकारली. बऱ्याच कलाकारांमध्ये त्याने आपली उपस्थिती लावण्यात तो यशस्वी ठरला. ‘अंजाना अंजानी’च्या फ्लॉप झाल्याचे त्याला वाईट वाटत आहे पण खरोखरच ते चित्रपट इतके बेकार होते की चार रणबीर असते तरी ते चित्रपटाला वाचवू शकले नसते, हे निश्चित आहे.

webdunia
IFM
शाहिद कपू
(चांस पे डांस, पाठशाला, बदमाश कंपनी, मिलेंगे मिलेंगे)
मागील वर्ष ‘कमीना'पन दाखवणारा शाहिद कपूर या वर्षी थोडा साधारण राहिला. अध्यापक बनला, डांस टिचर बनला, बदमाश बनून कंपनी चालवली आणि मिलेंगे-मिलेंगेमध्ये एक्स गर्लफ्रेंड करीना सोबत डांस केला, पण त्याचा परिणाम सिफरच राहिला. घाबरून त्याने आपल्या वडिलांचे बोट पकडले, तर आता पंकज कपूर शाहिदला घेऊन ‘मौसम’चित्रपट तयार करीत आहे.

webdunia
IFM
शाहरुख खा
(दूल्हा मिल गया, माय नेम इज खान)
‘माय नेम इज खान’ने देश-विदेशात यश मिळवून किंग खानच्या बादशहातला कायम ठेवले. तसे तर दुसरे अभिनेता त्याच्या जास्त मागे नाही आहे. इतर प्रकरणात तो इतका गुंतलेला होता त्यामुळे त्याने या वर्षी कमीच चित्रपट केले. 2011 त्याच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण साबीत होणार आहे कारण ‘रॉ-वन’ आणि ‘डॉन 2’ सारखे मोठे चित्रपट रिलीज होत आहे.

webdunia
PR
इमरान हाशम
(वंस अपॉन ए टाइम इन मुंबई, क्रूक : इटस गुड टू बी बैड)
‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई’च्या सफलतेमुळे इमरानने हे सिद्ध केले की भट्ट बंधुंबगैर तो चांगला अभिनय करू शकतो आणि सफलसुद्धा होऊ शकतो. ‘क्रूक’मध्ये त्याने जुने लटके झटके दाखविले, चुंबन घेतले, पण दर्शकांनी त्याला नाकारले, कारण दर्शक आता त्याच्या ह्याच अभिनयामुळे कंटाळलेले आहेत.

webdunia
IFM
इमरान खा
(आय हेट लव्ह स्टोरीज, ब्रेक के बाद)
लाख प्रयत्नांनंतर रणबीर कपूरला इमरान खान मात करू शकत नाही. ‘ब्रेक के बाद’नंतर ही त्याच्या अपयशावर ब्रेक लागला नाही. ‘आय हेट लव्ह स्टोरीज’च्या सफलतेने त्याला लाईम लाइटमध्ये ठेवले पण इमरानला आपल्या मामाकडून बरेच काही शिकणे गरजेचे आहे.

webdunia
IFM
ऋत्विक रोशन
(काइटस, गुजारिश)
काइटस अशी कटली की ऋत्विकची झोप अद्याप उडालेली आहे. ज्या चित्रपटासाठी त्याने आपले सर्वस्व दाववर लावले होत तो चित्रपट असा फ्लॉप होईल याचा त्याला बिलकुल अंदाजा नव्हता. ‘गुजारिश’मध्ये त्याचा अभिनय उत्तम आहे, प्रशंसादेखील झाली, पण जर हे चित्रपट सफल झाले असते तर ऋत्विकला त्याचा खरा आनंद मिळाला असता. या दोन्ही चित्रपटांच्या अपयशामुळे त्याला आता नवीन सुरुवात करावी लागणार आहे.

webdunia
IFM
नील नीतिन मुकेश
(लफंगे परिंदे, तेरा क्या होगा जॉनी)
लफंगे बनवून सफलतेच्या आकांक्षांवर परिंदा सारखा उडण्याचा प्रयत्न केला पण तो काही केल्या सफल झाला नाही आणि धाडकन खाली पडला. नीलपासून दर्शकांना अजूनही बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याला गरज आहे फक्त एक हिट चित्रपटाची, जे त्याला कदाचित 2011मध्ये मिळू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi