Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलीवूड 2010 : अभिनेत्र्यांचा स्कोअरकार्ड!

बॉलीवूड 2010 : अभिनेत्र्यांचा स्कोअरकार्ड!

वेबदुनिया

IFM
कतरीना कैफ
(राजनीती, तीस मार खाँ)
कतरीनाची लोकप्रियतेचा ग्राफ दिवसंदिवस वर चढत आहे. ‘राजनीती’च्या माध्यमाने तिने दाखवून दिले की ती फक्त ग्लॅमर डॉलच नसून अभिनयसुद्धा करू शकते व चॅलेंजिंग रोलसाठी तयार आहे. दुसरीकडे ‘शीला की जवानी’ने त्याची दखल घेत बॉलीवूडने तिला सढळ हस्ते नंबर 1 वर बसवलं. बॉलीवूडचा प्रत्येक हिरोला कतरीना सोबत काम करायचे आहे.

webdunia
IFM
प्रियंका चोप्रा
(प्यार इंपॉसिबल, अंजाना अंजानी)
प्रियंका चोप्राच्या खात्यात या वर्षी असफलताच आली. पैसा कमाविण्यासाठी ती उदय चोप्राची हिरॉइन बनण्यास तयार झाली आणि हे सर्वांनाच माहीत आहे की उदयचे चित्रपट बॉक्स ऑफिस सफल होणे इंपॉसिबल आहे. ‘अंजाना-अंजानी’च्या फ्लॉप झाल्याने प्रियंकाला जरूर धक्का बसला असेल. रणवीर देखील चित्रपट वाचवू शकला नाही. हिद कपूर बरोबर तिचे प्रेम प्रसंग सुरू असल्याने ती चर्चेत राहिली.

webdunia
IFM
करीना कपूर
(मिलेंगे मिलेंगे, व्ही आर फॅमिली, गोलमाल 3)
2010 ने जाता-जाता बेबोच्या खात्यात ‘गोलमाल 3’ सारखे सुपरहिट चित्रपट टाकले. या चित्रपटात ती एकमात्र हिरॉइन असून तिचा रोलही दमदार आहे. 'व्ही आर फॅमिली’मध्ये काजोलशी टक्कर घेऊन तिने हे साबीत केले की ती कुणाशी कमी नाही आहे. ‘मिलेंगे मिलेंगे’च्या माध्यमाने बेबोच्या समोर शाहिद कपूर येऊन उभा राहिला पण करीना बरोबरच दर्शकांनी त्याच्याशी भेटणे जरूरी समजले नाही.

webdunia
IFM
बिपाशा बसू
(पंख, लम्हा, आक्रोश)
ग्लॅमरस रोलला नकार दिल्यानंतर दमदार रोल करण्याच्या चकरांमध्ये बिपाशाने आपल्या पायावर स्वत:च कुल्हाडी मारली. ‘लम्हा’ बघूनच दर्शक आक्रोशात आले आणि त्यांना बिपाशा या रोलमध्ये जमली नाही. आम्हाला तर ‘बिडी जलई ले’ वाली बिपाशाच आवडते अशी त्यांची प्रक्रिया होती. बिप्सच्या स्टार वॅल्यूत जबरदस्त कमी आली आहे.

webdunia
IFM
विद्या बाल
(इष्किया)
इष्कियामध्ये विद्याने बोल्ड रोल करून दर्शकांचा एकदम आश्चर्यचकित केले होते. शिव्या गाळ्यापण केल्या आणि अरशदला किससुद्धा केले. तिच्या कामाची फार तारीफ झाली आणि चित्रपटाने देखील चांगला बिझनेस केला. एका चांगल्या एक्ट्रेस म्हणून या वर्षी देखील तिने आपला विश्वास कामय ठेवला.

webdunia
IFM
दीपिका पादुको
(कार्तिक कॉलिंग कार्तिक, हाउसफुल, लफंगे परिंदे, ब्रेक के बाद, खेलें हम जी जान से)
दीपिकाच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबघून एकच गोष्ट लक्षात येते म्हणजे ‘पिटें हम जी जान से’. तिची अशी अवस्था बघून त्या निर्मात्यांचा पसीना सुटत आहे जे दीपिकाला घेऊन चित्रपट तयार करीत आहे. ‘हाउसफुल’च्या माध्यमाने तिला एक औसत सफलता मिळाली आहे. रणवीरबद्दल उलट-सुलट बोलून तिला बऱ्याच लोकांची नाराजगी घ्यावी लागली.

webdunia
IFM
लारा दत्ता
(हाउसफुल)
या वर्षी चित्रपट तर नाही पण ती तिच्या साखरपुड्यामुळे जास्त चर्चेत राहिली. नाही-नाही म्हणत तिने शेवटी भूपतीला आपला जोडीदार निवडला. एकमात्र प्रदर्शित हाउसफुलची सफलतेत तिचा योगदान केवढा आहे ही गोष्टी तीपण चांगल्याप्रकारे ओळखते.

webdunia
IFM
कंगना
(काइटस, वंस अपॉन ए टाइम इन मुंबई, नॉक आउट, नो प्रॉब्लम)
काइटस, नो प्रॉब्लम आणि नॉक आउटमध्ये कंगनाच्या रोल बघून लगेचच लक्षात येते की ती रोल निवडण्याच्या बाबतीत किती नासमज आहे. त्यात तिचा अभिनयपण बघण्यासारखा नव्हता. बॉलीवूडचे मोठे हिरो तिला चित्रपटात घेण्यास तयार नाही. ‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई’मुळे तिची प्रतिष्ठा वाचली.

webdunia
IFM
अनुष्का शर्म
(बदमाश कंपनी, बँड बाजा बारात)
यशराज कॅंपमधून अनुष्का बाहर आलेली नाही. ‘बदमाश कंपनी’ आणि ‘बँड बाजा बारात’मध्ये तिचा अभिनय कौतुक करण्यासारखा होता. बॉलीवूडच्या बऱ्याच दिग्दर्शकांचे अनुष्कावर डोळे आहे. हळू-हळू पण ती योग्य दिशेत पुढे जात आहे.

webdunia
IFM
काजोल
(माय नेम इज खान, व्ही आर फॅमिली, टूनपुर का सुपरहीरो)
2010 काजोलसाठी अविस्मरणीय राहील कारण तिला मुलाच्या रूपात एक नवीन फॅमिली मेंबर मिळाला आहे, तर ‘माय नेम इज खान’च्या यशाने तिची आणि शाहरुखच्या जोडीने शत-प्रतिशत सफलतेचा रिकॉर्ड कायम केला आहे. काही चित्रपट चालले नाही, पण काजोलचा अभिनय नेहमीसारखाच स्तरीय राहिला.

webdunia
IFM
सोनम कपूर
(आय हेट लव्ह स्टोरीज, आयशा)
सोनमला जास्तीत जास्त चित्रपट करायला पाहिजे, पण वडील अनिल कपूरने बहुतेक तिच्यावर रोख लावली आहे. तशीपण ती फार नखरे करते, म्हणून निर्माता तिला घेऊन डोकेदुखी करून घेण्याचा विचार करीत नाही आहे. आय हेट लव्ह स्टोरीजला सामान्य सफलता मिळाली, पण पूर्णपणे तिच्यासाठी तयार केलेले चित्रपट ‘आयशा’ने तिची आशा पूर्णपणे निराशेत बदललेली आहे.

webdunia
IFM
मुग्धा गोडसे
(हेल्प)
‘फॅशन’ सारख्या चित्रपटापासून आपले करियर सुरू करणाऱ्या मुग्धा आपली वेगळी ओळख बनवू शकली नाही. बिकनी घालून आणि तिने दर्शकांकडून ‘हेल्प’ मागितली, पण तिला काहीच मदत मिळाली नाही. दर्शकांना मुग्ध करण्यासाठी तिला लवकरच काही करावे लागेल.

webdunia
IFM
ऐश्वर्या राय
(रावण, रोबोट, एक्शन रिप्ले, गुजारिश)
‘रोबोट’ने सफलतेचे नवीन अध्याय लिहिले, पण या चित्रपटाच्या सफलतेत ऐश्वर्याचे योगदान नगण्य आहे. रावण, एक्शन रिप्ले आणि गुजारिशच्या असफलतेमुळे ऐश्वर्या निराश झाली आहे. आता अशी चर्चा सुरू आहे की तिने आता आपले पूर्ण लक्ष्य परिवाराकडे दिले पाहिजे.

webdunia
IFM
मल्लिका शेरावत
(हिस्स)
’हिस्स’ बघितल्यावर मल्लिकाने केलेले सर्व दावे खोटे ठरले, जे तिने चित्रपट रिलीज होण्या अगोदर केले होते. या पेक्षा चांगले चित्रपट बॉलीवूडमध्ये बनतात. चित्रपटात मल्लिकाने एक ही संवाद बोललेला नाही आहे. आणि चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता तिची बोलती पूर्णपणे बंद झाली आहे.

webdunia
IFM
जेनेलिया डिसूज
(चांस पे डांस)
जेनेलिया कुठे ना कुठे चुक करत आहे. ‘जाने तू या जाने ना’च्या यशानंतर इमरान बराच पुढे निघून गेला, पण जेनेलिया तिथल्या तिथेच राहून गेली. ‘चांस पे डांस’ने तिला डांस करण्याचा मोका दिला नाही. आता चित्रपट मिळवण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi