Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आईच्या स्क्रिप्टला शाहिदचा नकार

आईच्या स्क्रिप्टला शाहिदचा नकार
शाहिद कपूरला घरच्या चित्रपटासाठीही वेळ नाही असं आतापर्यंत वाटत होतं. पण कारण भलतंच निघालं. वडिल पंकज कपूर आणि आई निलिमा अंजीम यांनी शाहिदला घेऊन चित्रपट काढायचं ठरवलं. त्यासाठी निलिमाने स्वतःच स्क्रिप्ट लिहिलं. स्क्रिप्ट वाचल्यानंतर शाहिदने आपल्याला वेळच नसल्याने थांबायला सांगितलं. पण आई-वडिल खूपच मागे लागले तेव्हा शाहिदने स्क्रिप्टमधल्या चुका काढल्या. निलिमा नाराज झाली. ती मग इमरान हाशमीकडे गेली. पण इमरानने आधी शाहिदने नकार का दिला हे जाणून घेतलं. मग स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्यातला 'झोल' त्याच्या लक्षात आला. नंतर त्यानेही नकार दिला. बिचारी निलिमा मुलगा स्टार असूनही त्याला घेऊन चित्रपट करू शकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi