Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आलियाने योगा केला नाही, कारण..

आलियाने योगा केला नाही, कारण..
, बुधवार, 24 जून 2015 (10:37 IST)
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने जागतिक योग दिनाला योगा केला नाही कारण तिच्या खांद्याला दुखापत झाली आहे. तिने फोटो शेअरिंग वेबसाईट इंस्टाग्रामवर दुखापतीचे फोटोही अपलोड केले आहेत.
 
आलियाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या डाव्या हाताला पट्टी बांधली आहे. माझा जागतिक योग दिन अशाप्रकारे झाला. तुम्हा सर्वाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. या वयात खांद्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे फार काही त्रास नाही. येत्या दोन आठवडय़ात ठीक होईन, असे इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन आलियाने लिहिले आहे. दरम्यान, ही दुखापत कशामुळे झाली याबाबत आलियाने अद्याप स्पष्ट केले नाही. सध्या आलिया तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये म्हणजेच ‘कपूर अँड सन्स’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi