Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अँक्शनपॅक्ड अकिरासाठी 50 कोटी खर्च

अँक्शनपॅक्ड अकिरासाठी 50 कोटी खर्च
, सोमवार, 20 जुलै 2015 (12:41 IST)
निर्माता मुरूगदास याने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला घेऊन बनविलेल्या अँक्शनपॅक्ड अकिरा चित्रपटासाठी 50 कोटी रूपये खर्च आला असून हा डाव मुरूगदास यांच्या अंगाशी येऊ शकेल असे मत व्यक्त केले जात आहे. हा चित्रपट सोनाक्षी आणि सोनाक्षीसाठीच बनविला गेला आहे. यात हिरो दुय्यम भूमिकेत दिसेल.

यापूर्वीही सोनाक्षीने हॉलीडे चित्रपटातून अँक्शन भूमिका केली होती मात्र चित्रपटाचा हिरो अक्षयकुमार होता. त्यानंतर सोनाक्षीचे अँक्शन जॅक्सन आणि तेवर सुपरफ्लॉप झाले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा सोनाक्षीलाच प्रमुख भूमिकेत चमकावून मुरूगदास याने मोठीच रिस्क घेतल्याचे मत व्यक्त होत आहे.

या चित्रपटात सोनाक्षी मिक्स मार्शल आर्ट करताना दिसणार आहे. यापूर्वीही हिरॉईनभोवती केंद्रित असलेले चित्रपट आले आहेत मात्र इतका खर्च कोणत्याच चित्रपटासाठी केला गेलेला नाही. ऐश्वर्याच्या जज्बासाठी 16 कोटी, दीपिकाच्या पीकूसाठी 26 कोटी, तनू वेडस् मनू रिटर्नसाठी 26 कोटी, राणी मुखर्जीच्या मर्दानीसाठी 10, क्वीनसाठी 10 व विद्या बालनच्या कहानीसाठी 9 कोटी रूपये खर्च केला गेला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi