Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्षयकुमारच्या ‘बेबी’चा फर्स्ट लूक

अक्षयकुमारच्या ‘बेबी’चा फर्स्ट लूक
, सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (17:50 IST)
सुपरस्टार अक्षयकुमारने ‘बेबी’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण केले. पोस्टरमधील डोक्यावर बेस बॉल कॅप, डोळ्यांवर एव्हिएटर गॉगल आणि मिशा ठेवलेला अक्षयकुमार धीरगंभीर मुद्रेत निदर्शनास पडतो. 
 
त्याचप्रमाणे इस्तंबूलमधील रस्त्यावर तो कोणाचा तरी पाठलाग करत असल्याचेदेखील या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी ‘अ वेनस्डे’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अक्षयने चित्रपटाचे पोस्टर टिटरवर प्रसिद्ध केले असून, तुम्हाला या पोस्टरबाबत काय वाटते, असा प्रश्नदेखील त्याने चाहत्यांना विचारला आहे. सुरुवातीला बरेचसे चित्रीकरण नेपाळमध्ये करण्यात आलेल्या या चित्रपटातील हाणामारीची काही दृष्ये इस्तंबूलमध्ये चित्रीत करण्यात आली. ‘चश्मे बद्दूर’ चित्रपटाची अभिनेत्री तपसी पन्नू यात प्रमुख स्त्री व्यक्तिरेखा साकारत आहे. पुढच्या वर्षी 23 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi