Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर सलमान खान ‘शुद्धी’साठी तयार

अखेर सलमान खान ‘शुद्धी’साठी तयार
, शनिवार, 19 जुलै 2014 (11:17 IST)
निर्माता -दिग्दर्शक करण जोहर याला आपल्या आगामी ‘शुद्धी’ या सिनेमासाठी अखेर हिरो मिळालाय.. त्याच्या या सिनेमात आता काम    करणार आहे.. नन अदर दॅन.. सलमान खान..
 
धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होणार्‍या करणच्या या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये सलमान काम करणार असल्याचं खुद्द करणनंच माहिती दिलीय. त्यानं ट्विटर या सोशल वेबसाईटवरून त्याच्या आणि सलमानच्या फॉलोवर्सपर्यंत ही माहिती पोहचवलीय. ‘शुद्धी या सिनेमाचा हिरो असेल सलमान खान.. आणि हा सिनेमा 2016 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल’ असं ट्विटरवर करणनं म्हटलंय. यापूर्वी या सिनेमात हृतिक रोशन आणि करिना कपूर खान काम करणार होते.. पण, तारखा न जुळल्यानं दोघांनीही या सिनेमातून काढता पाय घेतला.. पण, निर्माता करण जोहरला नवा हिरो शोधण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही आणि सलमानवर येऊन त्याची ही शोध मोहीङ्क थंडावली. ‘शुद्धी’ हा करणचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय. करणच्या म्हणण्यानुसार, सलमान खानशिवाय ही भूमिका दुसरं कुणीही चांगल्या पद्धतीनं निभावू शकणार नाही. आता, ‘शुद्धी’चा हिरो सापडलाय पण हिरोईनचा शोध मात्र अद्यापही सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या भूमिकेसाठी दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची नावे या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi