Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजयसोबतचा सोनमचा पहिला चित्रपट

अजयसोबतचा सोनमचा पहिला चित्रपट
, मंगळवार, 26 मे 2015 (14:15 IST)
दिग्दर्शक मिलन लुथरियाच्या ‘बादशाहो’ या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत सोनम कपूरचा समावेश असल्याचे समजते. सोनमने आजपर्यंत अक्षयकुमार (थँक्यू) आणि सलमान खान या सिनियर अँक्टर्ससोबत (सांवरिया) काम केले आहे. सलमानसोबतचा ‘प्रेम रतन धन पायो’ हा तिच्या आतापर्यंतच्या करिअरमधील मोठा चित्रपट आहे. आता ती ‘बादशाहो’मध्ये अजय देवगणसोबत दिसणार असल्याचे समजते. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई’ चे दिग्दर्शक मिलन लूथरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. इमोशनल ड्रामाबरोबरच चित्रपटात फुल मसाला अँक्शनचा समावेश असून हा चित्रपट मार्च 2016 मध्ये रिलीज करण्याचे नियोजन आहे. सध्या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन करण्यात येत आहे.
 
चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून यामध्ये अजयचे शेडय़ूल सुरुवातीला असणार आहे. तेव्हा सोनम ‘प्रेम रतन.’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र राहील. सोनमने या चित्रपटाबाबत दुजोरा दिला नाही. तसे तर ती कोणत्याच चित्रपटाची स्वत:हून घोषणा करत नाही. एका चर्चेमध्ये तिने सांगितले की, ‘मी काही गोष्टी गोपनीय ठेवण्यामध्ये वाक्बगार आहे. चित्रपटाबाबतची अधिकृत घोषणा करण्याचा हक्क निर्माता-दिग्दर्शकांना असतो. त्यांच्या मर्जीनुसार ते सिनेतार्‍यांची घोषणा करू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi